ओशाे - गीता-दर्शन

25 Nov 2022 14:42:44
 

Osho 
 
क्राेधाग्नि निर्माण करणं आहे. आपण सर्वांना क्राेधाची चांगली जाणीव आहे. क्राेधापेक्षा आणखी माेठी शिक्षा असू शकते काय? पण काेणी दुसऱ्याने शिव्या देताच आपला क्राेध उफाळून वर येताे.’ बुद्ध म्हणतात, ‘दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वत:ला शिक्षा!’ आपण सगळे हेच करीत असताे.स्वत:शी मैत्री काेणाचीच नाही. स्वत:शी मैत्री असणे अवघड का असते? तर अन्य जण दिसू शकतात, दिसत असतात. व्हिजिबल आहेत.आपण त्यांच्या मैत्रीसाठी हात पुढे करू शकताे.पण स्वत: तर एकदम इनव्हिजिबल, अदृष्य सत्तेच्या स्वरूपात असताे, त्या सत्तेपुढे हात पुढे करण्याचा काहीच उपयाेग नसताे. इतर जणांची, मित्राची प्रशंसा करता येते, त्यांना आपण भेट वस्तू देऊ शकताे. काही दाेस्तीचे रस्ते हुडकता येतात; पण स्वत:बाबत मात्र असा काेणताच मार्ग नाहीये.
 
स्वत:बाबत तर शुद्ध मैत्रीभाव श्नय आहे. दुसरा कुठला मार्ग नाहीये, काेणताच पूल नाही. काेणता एखादा पूल असलाच तर ताे फ्नत अंडरस्टॅडींगचाच, समजूतदारपणाचाच. पण तेवढी समज आपणांत नसते.आपण सगळे वेडगळपणात जगत असताे. या वेडगळपणाचा ताठा असा काही असताे की, उमज अजिबात येऊ शकत नाही. तिच्यासाठी आपण एकही दरवाजा उघडा ठेवत नसताे. गंमत अशी की ज्यांना उमज नाही, अशी माणसे स्वत:ला समजतात मात्र ज्ञानसूर्याचे अवतार. अन् एकदा का माणसाने अशी समजूत करून घेतली की, मग उमज जरी दारावर आली आणि तिनं दार ठाेठावलं तरी दार बंदच राहते. मग ते उघडणे अजिबात श्नय नाही. कारण, ज्याला सगळं समजतंय त्याला आणखी काही समजून घ्यायची काय गरज आहे? आपल्या या तथाकथित समजूतदारपणाचा जाे आधार आहे ताे काेणता? ताे म्हणजे हा भ्रमच की आपण स्वत:वर प्रेम करताे आहाेत. हे तर पूर्णपणे खाेटे असते, असत्य असते.
Powered By Sangraha 9.0