त्रिविधतापे पाेळला । ताेचि येक अधिकारी जाला ।।1।।

24 Nov 2022 16:51:36
 
 

saint 
 
श्रीदासबाेधाच्या तिसऱ्या दशकातील सहा, सात आणि आठ या तीन समासांचा एक समुच्चय आहे. मनुष्याला जन्माला आल्यानंतर त्याला सुखाबराेबरच दु:खही भाेगावे लागतेच. अशा भाेगाव्या लागणाऱ्या दु:खाचे तीन प्रकार मानले गेलेले आहेत.पहिला प्रकार म्हणजे शरीर आणि इंद्रिये यांचे आजारपण, राेग आणि विकलता यामुळे भाेगावे लागणारे दु:ख, ज्याला आपण राेजच्या भाषेत शरीरदु:ख म्हणताे.यालाच वेदांतात आध्यात्मिक ताप असे म्हणतात.
 
दुसरा प्रकार म्हणजे जगातील इतर माणसे, पशू, पक्षी, प्राणी यांच्यापासून भाेगावे लागणारे त्रास आणि दु:ख त्याला वेदांतात आधिभाैतिक ताप असे म्हणतात दु:खाचा तिसरा प्रकार म्हणजे मानवाने जिवंतपणी केलेल्या पापपुण्यामुळे म्हणजेच बऱ्यावाईट गाेष्टींमुळे त्याला मृत्यूनंतर भाेगावे लागणारे दु:ख व यातना; त्यांना आधिदैविक ताप असे म्हणतात.या तिन्ही तापांना मिळून त्रिविधताप किंवा तापत्रयी म्हटले जाते. या तीन समासांच्या मागील सूत्र असे आहे की, जाे माणूस जीवनामध्ये या त्रिविधतापामुळे कष्टी हाेऊन दु:ख भाेगताे ताेच त्यांच्यातून सुटण्याचा विचार करून परमार्थी हाेण्यास लायक ठरताे. या तिन्ही प्रकारच्या दु:खांची, ्नलेशाची आणि त्रासांची माहिती श्रीसमर्थांनी या तिन्ही समासात क्रमाक्रमाने दिलेली आहे.
Powered By Sangraha 9.0