ओशाे - गीता-दर्शन

24 Nov 2022 16:50:34
 
 

Osho 
 
मैत्री ही माेठी साधना आहे, शत्रुत्व हा मुलांचा खेळ आहे. म्हणून आपण शत्रुत्वात सहज उतरताे आणि स्वत:शी मैत्री तर फारच कठीण आहे.इतरांचा मित्र हाेणे जर इतके अवघड आहे तर स्वत:शी मैत्री करणे तर त्याहूनही अवघड आहे आपण विचाराल ‘का? इतरांशी मैत्री करणे अवघड असले तरी स्वत:शी मैत्री जास्त अवघड का असते? स्व-मैत्री तर अगदी साेपी असायला पाहिजे.’ आपलं निदान स्वत:वर तरी प्रेम असतच असतं. हा आपला सर्वांचा एक लाडका भ्रम आहे; पण ताे भ्रम आहे हे लक्षात यायला पाहिजे. ज्याचे स्वत:वर प्रेम आहे असा माणूस धुंडाळणे फार जिकीरीचे अन् अवघड काम आहे. कारण जाे काेणी स्वत:वर प्रेम करील त्याच्या आयुष्यात वाईटपणा राहणारच नाही, ते अश्नय आहे. स्वत:वर प्रेम करणारा माणूस मद्य पिऊ शकेल काय?
 
किंवा क्राेध करू शकेल काय? बुद्ध एका रस्त्याने जात असतात. तिकडून एक माणूस येताे आणि त्यांना शिव्या देऊ लागताे.बुद्धांच्या बराेबर एक भिक्षू असताे-आनंद. ताे बुद्धांना म्हणताे की मला फ्नत परवानगी द्या, म्हणजे मी याला लगेच ठीक करताे. यावर बुद्ध हसतात. आनंद विचारताे की, ‘आपण हसता कशासाठी?’ बुद्ध म्हणतात, ‘आनंदने विचारलंय त्याचं मला हसू येतंय. इतरांच्या चुकीचे फळ हा आनंद भाेगू इच्छिताेय. हा आनंद वेडा दिसताेय, दुसऱ्या एखाद्या वेड्याच्या चुकीसाठी हा स्वत:ला शिक्षा करून घेताेय? आनंद म्हणताे, ‘मी समजलाे नाही.’ बुद्ध म्हणतात, ‘शिवी देणारा ताे आहे, क्राेध तू करू पाहताेयस. शिक्षा तू करून घेणार...’ क्राेध म्हणजे काय? तर ते स्वत:मध्ये आग लावणं आहे.
Powered By Sangraha 9.0