ज्ञानदेव म्हणे या चाडें । सद्गुरूंनी केलें काेडें । माथां हात ठेविला तें ुडें । बीजचि वाइलें ।। 6.492

24 Nov 2022 16:31:23
 
 
 

dyaneshwari 
 
 
सहाव्या अध्यायाचा शेवट करताना आपल्या सद्गुरुनाथांनी आपणांवर केवढी कृपा केली आहे, याचे माेठ्या आत्मियतेने वर्णन ज्ञानेश्वर या ओवीत करीत आहेत. याेगी पुरुष ब्रह्मवस्तूशी कसा समरस हाेताे हे वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वर याआधी म्हणतात की, अशा अवस्थेत जाताना मनरूपी मेघ राहात नाही.प्राण, आकाश, नादबिंदू, कलाज्याेती इत्यादीही राहात नाहीत. जाणीव कमी हाेऊन बाेलणे जवळजवळ बंदच हाेते. अशारीतीने मागील जन्मातील सत्कर्मे चांचल्यादी केरकचरा नाहीसा करतात. आणि मग मात्र लग्नघटिका पाण्यात बुडते.म्हणजे जीवाचे ऐक्य ब्रह्माशी हाेते. साधकाला ब्रह्मरूपाच्या ठिकाणी विश्व भासते. ब्रह्मवस्तूच्या प्राप्तीसाठी आत्मज्ञानी पुरुष प्रपंचरूपी रणांगणावर युद्धच करीत असताे. भजन करणारे, यज्ञ करणारे जसे सर्वांना पूज्य असतात, तसा याेगी पुरुष सर्वांना आदरणीय वाटताे.
 
म्हणून अर्जुना, तू अंत:करणाने याेगी हाे. म्हणजे तुझी वृत्ती अखंडपणे आत्मस्वरूपी रममाण हाेईल. तू मद्रूपच हाेऊन जाशील.अर्जुना, असे हे आम्हां दाेघांतील प्रेम शब्दाने सांगता येईल का? श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील हा संवाद संजय धृतराष्ट्राला सांगत आहे.श्रीकृष्णांच्या मुखातून निरूपण ऐकण्याची अर्जुनाची इच्छा अधिक प्रबळ झाली आहे.या निरूपणातील शांत रसाला सात्त्विक गुणांचे अंकुर ुटले आहेत. श्रीकृष्णांचे हे विवेचन ज्ञानेश्वरांना निवृत्तिनाथांकडून प्राप्त झाले, हे ज्ञानेश्वर चाड्याचा दृष्टांत देऊन सांगतात. चाडे म्हणजे बी पेरण्याकरिता पाभरीवर जे लाकडाचे पात्र असते ते.निवृत्तिनाथांनी आपणांस हे चाडे बनवून सिद्धांतरूपी बीज आपल्या अंत:करणात पेरले.
Powered By Sangraha 9.0