जुळ्या भावांचे जुळ्या बहिणींशी लग्न

22 Nov 2022 18:15:29
 

twin 
 
जगात आतापर्यंत अशी केवळ 300 कुटुंब संध्यानंद. काॅम अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतामध्ये जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांशी लग्न झाल्यानंतर दाेघींनाही मुलगे झाले आहेत.तसे तर दाेघींची मुले सख्खे भाऊ नाहीत.पण शास्त्रज्ञ त्यांना ‘जेनेटिक ब्रदर्स’ म्हणजे आनुवंशिक भाऊ म्हणत आहेत.विज्ञानाच्या भाषेत अशा भाऊ- बहिणींना ‘्नवाटर्नरी ट्विन्स’ सुद्धा म्हटले जाते. 35 वर्षांची ब्रियाना अणि ब्रिटनी डीन या जुळ्या बहिणींनी 37 वर्षांच्या जाॅश आणि जेरेमी सल्येर्स या जुळ्या भावांशी सन् 2018 मध्ये लग्न केले.
 
त्यानंतर दाेन्ही कपल्सच्या घरी जॅ्नस आणि जेट यांचा जन्म झाला. दाेन्ह मुले एक वर्षांची आहेत. ते चुलतभाऊ आहेत. आणि त्यांच्या जन्मात तीन महिन्यांचे अंतर आहे. पण आनुवंशिक रूपाने पाहायचे झाले तर त्यांचे डीएनए समान आहेत.्नवाटर्नरी ट्विन्सचा जन्म खूप दुर्मीळ आहे. अशी मुले जी सर्वसाधारणपणे नऊ महिन्यांपेक्षा कमी अंतराने जन्माला येतात आणि ज्यांचे आई-वडील जुळे आहेत, त्यांना ्नवाटर्नरी ट्विन्स म्हटले जाते. ते टे्निनकली चुलतभावंडे असतात. पण त्यांचे जीन्स माेठ्या प्रमाणात समान असतात.
असे हाेणे इतके दुर्मीळ आहे की, जगात आतापर्यंत अशी केवळ 300 कुटुंबे असल्याची माहिती समाेर आली आहेत.
Powered By Sangraha 9.0