एकाने विचारले, ‘‘मुनिश्री ! एखादा श्रद्धाळू तुमच्या पाया पडताे तेव्हा आपल्याला काय वाटते?’’ मी म्हणालाे, ‘‘आज कुणी माझ्या पायावर डाेकं ठेवताे आहे, तर उद्या कुणी डाेक्यावर पायही ठेवू शकताे. लक्षात ठेवा, मनुष्याने, मान-अपमान दाेन्ही गाेष्टींमध्ये समभाव राखला पाहिजे. परंतु हे सर्वजण आचरणामुळे माझ्या चरणांना स्पर्श करत आहेत. त्यामुळे मी माझ्या आचरणापासून ढळता कामा नये.’’