पत्र अठ्ठाविसावे
हे मंडळ फार चांगले कार्य करत आहे व त्यामुळे कितीतरी मातापित्यांचे तंटे थांबले आहेत.आपल्या देशांतील तरुणांबद्दल मी आशावादी आहे.कितीतरी काॅलेजमध्ये व शाळांमध्ये व्याख्यानासाठी मी जाताे.माझी खात्री झाली आहे की तरुणांना गीतेचे आकर्षण आहे.शाळा काॅलेजमध्ये गीतेची शिकवणूक समजून सांगणे हे आपल्या निधर्मी राज्यघटनेच्या विरुद्ध नाही. धर्म याचा एक अर्थ Religion असा हाेताे. कृष्णाने महाभारतात धर्म याची व्याख्या जी केली आहे. ती पहाता धर्म ह्याचा अर्थ Moralityअसा आहे. गीतेची शिकवण सांगणे म्हणजे Religious Instructionनैतिक शिकवण देणे आहे. आपल्या घटनेप्रमाणे शाळा काॅलेजात Moral Instruction देता येणार नाही पण चेीरश्र Instructionनैतिक शिक्षण जरूर देता येईल.ठाण्याला काही दिवसांपूर्वी व्नतृत्वाच्या चढाओढी झाल्या.
महाराष्ट्रातील पुष्कळ काॅलेजमधून विद्यार्थी विद्यार्थिनी चढाओढीसाठी आले हाेते. मी मुख्य परीक्षक हाेताे. त्यांचे विचार ऐकून मी फार खुश झालाे. तुला वाटते की आपले विद्यार्थी राष्ट्रीय नाहीत. पण त्या विद्यार्थ्यांचे विचार ऐकून मला वाटले- महाराष्ट्रातले विद्यार्थी नुसतेच राष्ट्रीय नाहीत, तर महाराष्ट्रीय आहेत.भारताशिवाय इतर देशात साक्षात्कारी लाेक नाहीत ही तुझी समजूत बराेबर नाही.
साक्षात्काराच्या बाबतीत अग्रेसरत्वाचा मान भारताकडे जाताे. एल्.टी. हाॅबहाऊस म्हणताे कीउपनिषदांनी साक्षात्काराबद्दल सूक्ष्म विचार केला आहे व मानवी इतिहासात साक्षात्काराचे ध्येय प्रस्थापित करण्याचा पहिला मान भारताला आहे.तू असे लक्षांत घे की पहिला मान भारताला असला तरी इतर देशात देखील साक्षात्कारी संत निर्माण झाले आहेत ज्या संतांना साक्षात्काराची अनुभूती झाली त्यांच्यात काेणताही वंशिक, जातीय व राष्ट्रीय भेद असत नाही.
सब संत एक है। हे सूत्र खरे आहे.इव्हिलिन अंडरहिल(Evelyn Underhill) या बाईने Mysticismह्या नावाचे साक्षात्काराबद्दल सुंदर पुस्तक लिहिले.गुरूदेव रानडे ह्यांनी म्हटले आहे This book formed the basis of my Mysticism, ह्या गं्रथात खूप साक्षात्कारांचा उल्लेख नाही, याचे कारण लेखिकेला भारतीय वाङ्मयाचा अभ्यास नाही.तू असे लक्षात घे कीसाक्षात्काराच्या मार्गात चमत्काराला काहीच किंमत नाही.साक्षात्कार हा परमार्थामंदिराचा कळस आहे.रामकृष्ण म्हणतात कीपरमार्थमार्गात चमत्काराच्या जाेरावर लाेकांना आपल्याकडे आकृष्ट करून घेणे म्हणजे वेश्यागिरी करण्याप्रमाणे आहे.तू आपल्या डायरीत लिहून ठेव.
जाे करी चमत्कार, त्याला करू नका नमस्कार, जेथे वसे साक्षात्कार, तेथे नसे चमत्कार.मिस्टिसिझम् ह्या पुस्तकात खूप साक्षात्कारी लाेकांची माहिती दिली आहे. ती नितांत वाचनीय आहे.पुष्कळ लाेकांची अशी समजूत आहे की- पाश्चात्य साक्षात्कारी संत मूर्तिपूजक नसतात.ही समजूत चुकीची आहे पहिल्या प्रतीचा साक्षात्कारी प्लाॅटिनस हा (इसवीसन 205 ते 270) मूर्तिपूजक हाेता.ख्रिश्चन साक्षात्कारावर प्लाॅटिनसचा अप्रत्यक्ष प्रभाव पडलेला आहे. सेंट ऑगस्टाईन (354-430) हा तर प्लाॅटिनसचा आध्यात्मिक पुत्रच मानला जाताे.