ओशाे - गीता-दर्शन

22 Nov 2022 18:08:32
 
 
 

Osho 
येशूंने वचन असे आहे, ‘जज यू नाॅट, दॅट यू शुड नाॅट बी जज्ड्. तुम्ही काेणाचे न्यायाधीश बनू नका, म्हणजे मग काेणीही तुमचे न्यायाधीश हाेऊ शकणार नाही. मी काेण तुझ्याबद्दल निर्णय घेणारा! तू आहेस आणि तुझा ईश्वर आहे. तुम्हा दाेघांच्या मध्ये उभे राहणारा मी काेण? मी काेणीही नाही.मी जरा उंच जागेवर उभं राहून तुझ्याकडे पाहिलं तरीही ते पाप हाेईल आणि आता तर तू स्वीकार करतेस, की तू व्यभिचारिणी आहेस. तर मग तू आता पापातून मु्नत झालीस. आता ती गाेष्ट संपली.’ स्वीकार ही मु्नती आहे. अस्वीकृतीमागे पाप लपते अन् स्वीकृतीमध्ये त्याचे विसर्जन हाेऊन जाते. येशूंनी म्हटले, ‘मला तू यात गुंतवू नकाेस. मी काही तुझा न्यायाधीश व्हायचा नाही, कारण काेणी माझा न्यायाधीश असावा अशी माझी इच्छा नाही.’
 
इतरांनी तुमच्याशी जसे वागवं असे तुम्हाला वाटत नसेल, तर कृपा करून तुम्हीही त्याच्याशी तसे वागू नका. येशूंनी जे नवं बायबल सांगितलं, त्याचं सार काय? एका वा्नयात हेच की, ‘दुसऱ्यांनी तुमच्याशी जाे व्यवहार करू नये असे तुम्हाला वाटते, ताे व्यवहार तुम्हीही त्याच्याशी करू नका.’ हे वा्नय जर नीट समजून घेतले तर कृष्णाच्या या सूत्राचा अर्थ लक्षात येईल.कित्येक वेळा अशी गंमत हाेते की, कृष्णाच्या एखाद्या वा्नयाचे स्पष्टीकरण बायबलमध्ये हाेते तर बायबलमधल्या एखाद्या विधानाचे स्पष्टीकरण गीतेत हाेते. कधी कुराणातल्या कुठल्यातरी सूत्राचे, आयताचे स्पष्टीकरण वेदात हाेते. तर कुठल्यातरी वैदिक सूत्राचे स्पष्टीकरण काेणीतरी ज्यू फकीर करून जाताे. कधी बुद्धाचं कुठलतरी वचन चीनमध्ये समजून घेतले जाते. तर कधी चीनमधल्या लाओत्सेचे एखादे वचन एखादा कबीर समजावताे..
Powered By Sangraha 9.0