ओशाे - गीता-दर्शन

21 Nov 2022 14:30:47
 
 

Osho 
 
आपल्या शत्रूंवरही प्रेम करा’ असे येशूंनी सांगितले हाेते, त्याचे काय झाले? अन् जर येशूंनी असे म्हटले की, नाही हिला असं दगडांनी ठेचता येणार नाही, तिला क्षमा करा, माफी द्या. तर मग जुने धर्मग्रंथ कुचकामी झाले का? असा त्यांना दुहेरी पेचात पकडायचा त्या पंडितांचा डाव हाेता.पण येशूंसारख्यांना मुठीत बांधता येत नसते, हे त्यांना कुठे ठाऊक हाेते? अशी माणसे पाऱ्यासारखी असतात. मूठ बांधण्यानेच ती मुठीच्या बाहेर पडतात. येशूंनही म्हटले. ‘जुने ग्रंथ याेग्य तेच सांगताहेत. घ्या बघू हातात दगड आणि काढा ठेचून हिला.’ त्या सगळ्यांना तर माेठे आश्चर्य वाटले.असं काही हाेईल असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. येशूंनी पुढे म्हटले, ‘पण लक्षात ठेवा, ज्याने व्यभिचार केला नाही किंवा व्यभिचाराचा विचारदेखील केला नाही, अशा माणसानेच सुरुवात करावी.’
 
व्यभिचाराचा विचार न केलेला त्या गावात एकही मायेचा पूत नव्हता. असेल का असा माणूस एखाद्या तरी गावात! पगड्या बांधून, हातात दगड घेऊन मारण्यासाठी सरसावलेले ते सगळे जण मागच्या पावलांनी हळूहळू आपला पाय गर्दीतून काढते झाले. जे लाेक मागे उभे हाेते ते तर पटापट पळून गेले. त्यांना वाटले की, ‘इथे थांबणे काही ठीक नाही.’ ताे नदी-तट थाेड्याच वेळात निर्जन झाला. आता फ्नत येशू आणि ती स्त्री ही दाेघंच तिथं हाेती.बाकी सगळेजण तेथून गेल्यावर त्या स्त्रीने येशूंना म्हटले, ‘हाेय, मी व्यभिचारिणी आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे. कृपा करून मला शिक्षा द्या...’ येशूंनी तिला म्हटले, ‘मला माफ कर. ईश्वर न कराे की मी दुसऱ्याचा न्यायाधीश बनलं जावं. कारण मी काेणालाही माझा स्वत:चा न्यायाधीश बनवू इच्छित नाही.’ येशूंनी म्हटले, ‘ईश्वर न कराे की मी काेणाचा न्याय देणारा व्हावे, कारण मी काेणालाही मला न्याय देणारा बनवू इच्छित नाही.’
Powered By Sangraha 9.0