गीतेच्या गाभाऱ्यात

21 Nov 2022 14:25:29
 
 
पत्र अठ्ठाविसावे
 
 

Bhagvatgita 
आठव्या गुणाबद्दल बाेलताना सामाजिक मानसशास्त्रज्ञ म्हणतात की - नेत्याच्या अंगी विनाेदबुद्धी असणे आवश्यक आहे. अब्राहम लिंकन गंभीर प्रश्नाची चर्चा करतानादेखील विनाेद करत असे. त्यामुळे लाेक त्याच्यावर खुश असत. चर्चिलची विनाेदबुद्धी प्रसिद्ध आहे. एकदा हाऊस ऑफ काॅमन्समध्ये एक स्त्रीसभासद खूप संतापली व चर्चिलवर चिडून जाऊन म्हणाली- ‘तुम्ही माझे पती असता तर विषाचा प्याला मी तुमच्यापुढे केला असता.’ अजिबात न चिडता चर्चिल महाशय म्हणाले- ‘आणि मी ताे विषाचा प्याला आनंदाने प्यालाे असताे.’ पार्लमेंटचे वातावरण एकदम बदलले. रागाच्या ठिकाणी अनुराग निर्माण झाला. त्या स्त्रीचा रागदेखील मावळला.कृष्णाचे जीवन तुला माहीत आहे. त्याचे जीवन विनाेदबुद्धीने भरलेले आहे.
 
नवव्या गुणाबद्दल बाेलताना सामाजिक मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, अत्यंत कठीण प्रसंगीदेखील नेत्याने विषण्ण न हाेता प्रसन्न असले पाहिजे.भारतीय युद्धाच्या आरंभी अर्जुन विषण्ण हाेता; पण कृष्ण प्रसन्न हाेता. कृष्णाच्या जीवनाला विषण्णतेचा अंधकार माहीत नाही. त्याच्या जीवनात नेहमी प्रसन्नतेचा प्रकाश आहे. गीतेत कृष्णाने जीवनाचा महामंत्र सांगितला कीप्रसादे सर्व दु:खानांहानिरस्याेपजायते! मन प्रसन्न असले म्हणजे सर्व दु:खे नाहीशी हाेतात.तुला समजून येईल की, सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी नेत्याचे जे जे गुण सांगितले आहेत ते ते सारे गुण कृष्णाच्या ठिकाणी हाेते.सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास करून असे सार्थत्वाने म्हणता येईल कीकृष्णासारखे नेतेपण आजपर्यंत जगात झाले नाही. ते जितके महान तितकेच शाेभायमान, जितके ज्ञानयु्नत, तितकेच भ्नितयु्नत. जितके उच्च, उदात्त व उत्तुंग, तितकेच वंदनीय, नमनीय व कमनीय. आकाशाला उपमा आकाशाचीच, सागराला उपमा सागराचीच. त्याप्रमाणे कृष्णाच्या नेतेपणाला उपमा कृष्णाच्या नेतेपणाचीच.
 
आपल्या पत्रात तू सामाजिक मानसशास्त्रावरून साक्षात्कार विचारावर उडी मारली आहेस.तू लिहितेस- ‘साक्षात्कारी लाेक भारतात आहेत. इतर देशात साक्षात्कारी लाेक कां नाहीत? गुरुदेव रानडे यांना वाटते की, साक्षात्कार हे गीतेचे तात्पर्य आहे. मानवी जीवनाचे अंतिम ध्येय साक्षात्कार आहे. भारताशिवाय इतर देशात मानवी जीवन प्रगत हाेत आहे.असे असताना इतर देशात साक्षात्कारी लाेक का नाहीत?’ तुझा हा प्रश्न चांगला आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देऊन मग आपण त्या प्रश्नाकडे येऊ. तू लिहितेस.‘मला वाटते अमेरिकेत ज्याप्रमाणे तरुणांमध्ये स्वैराचार बाेकाळला आहे. त्याप्रमाणे आपल्या देशातदेखील तरुणवर्ग बहकत चालला आहे. महाराष्ट्रातील तरुण वर्गाचे विचार पाहता मला वाटते की हा वर्ग राष्ट्रीय नाही.
 
आपणाला काय वाटते?’ हे पहा गीतेच्या शिकवणीप्रमाणे संयम पाहिजे. अमेरिकेत स्वैराचाराचा प्रसार करणारे काही लाेक आहेत. हे खरे आहे पण तेथे देखील काही काही तरुण फार उत्कृष्ट कार्य करत आहेत.त्यांचे हे कार्य पाहून गीतामाऊली त्यांना शाबासकी देईल.उदाहरण म्हणून तुला सांगताे की- शिकागाेमधील हीदर ग्रे नावाच्या एका तरुणाने ‘गृहशांतिमंडळ’ स्थापन केले असून त्या मंडळाचे पुष्कळ तरुण सभासद आहेत.या मंडळाचा एक प्रमुख नियम असा आहे कीसभासदाच्या घरी त्याचे मातापिता आपसांत भांडत असल्यास त्यांच्याशी अबाेला धरून त्यांना या दुष्प्रवृत्तीपासून परावृत्त करणेचे.
Powered By Sangraha 9.0