काही लाेक म्हणतात की, मुनिश्री तरुणसागरजी कथा सांगताना खूप खूप हसवतात, मजा येते. अरे बाबा ! ही कथा आणि प्रवचन काय हसण्यासाठी आहे? उलट प्रवचन आणि कथा ऐकल्यानंतर रडायला तर आलेच पाहिजे की, आतापर्यंतचे माझे जीवन असेच खाण्यापिण्यात आणि झाेपण्यात गेले.सत्संग काही मनाेरंजनासाठी नाही, मनाेभंजनासाठी आहे.संत-मुनींच्या चरणी केवळ झुकायचे नसते, तर त्यांच्या चरणी लीन व्हायचे असते.