म्हणजे तिने शंखध्वनी म्हणजे च्नक बाेंबाबाेंब सुरू केली असे गंमतीने लिहून जातात. हे सगळे पाहून लाेक गाेळा हाेतात आणि म्हणतात ‘‘वा, मुले माेठी हाेऊन बापाचे छान पांग फेडत आहेत’’. त्या सर्वांना हे पाहून आश्चर्य वाटते व ही काय पापाची घटका आली म्हणून दु:खही हाेते.त्यामुळे ते शेवटी मधे पडतात आणि थाेडेसे जाेरजबरदस्तीने बापलेकांची वाटणी करून भांडण मिटवितात. म्हणजे ज्यांच्यासाठी नवससायास केले तीच मुले स्वार्थाने अंध हाेऊन प्रत्यक्ष बापाला मारहाण करण्यापर्यंत नीच हाेतात, ही मानवी जीवनाची शाेकांतिकाच म्हणावी लागेल.एवढे झाल्यावर घरदार स्वत:कडे घेऊन मुले आपल्या बापाला एक खाेपटे उभारून त्यात त्याची व सावत्र आईची रवानगी करतात. म्हणजे सुख व्हावे म्हणून जे संतान मागितले, त्यांनी पुढे दु:खच दिले. हे सांगून श्रीसमर्थ एका परीने खरे सुख काय आहे याचा विचार करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करीत आहेत, हे आपण जाणून घेतले पाहिजे! - प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299