पुणे, 17 नोव्हेंबर (आ.प्र.) :
सुप्रसिद्ध ज्योतिषविशारद प्राचार्य रमणलाल शहा व भालचंद्र ज्योतिर्विद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे (एस.पी. कॉलेज शेजारी) येथे दुपारी 2 ते सायंकाळी 6.30 या वेळेत ज्योतिष कार्यशाळा संपन्न होणार आहे. ‘ज्योतिषशास्त्राच्या एका नियमात जगातील बहुसंख्य व्यक्ती' या पुस्तकात जगातील एक हजार व्यक्तींच्या पत्रिका दिल्या आहेत. या पुस्तकात विवाह, घटस्फोट, प्रेमविवाह, शासकीय कामात यश, प्रतिष्ठा अशा अनेक विषयांची अत्यंत सोपी व सर्वांना समजणारी मांडणी केली आहे. ज्योतिषशास्त्र न समजणाऱ्या व्यक्तींनाही या पुस्तकाचा उपयोग होणार आहे. ‘ज्योतिषशास्त्राची प्रचिती' या दुसऱ्या पुस्तकात कुंडलीतील बारा स्थानांचे संपूर्ण विवेचन व शंभर पत्रिकांचे विश्लेषण आहे. ही संपूर्ण कार्यशाळा मोफत आहे.
ही कार्यशाळा या दोन्ही पुस्तकांच्या माध्यमातूनच समजणार आहे. ‘ज्योतिषशास्त्राच्या एका नियमात जगातील बहुसंख्य व्यक्ती' आणि ‘ज्योतिषशास्त्राची प्रचिती' या प्राचार्य शहा यांच्या पुस्तकांचे प्रकाशन कार्यशाळेत होणार आहे. यावेळी माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, माजी सहायक आयुक्त श्याम देशपांडे, उद्योगपती संजय इनामदार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस; तसेच भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाचे चंद्रकांत शेवाळे व बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळ, पुणेचे नंदकिशोर जकातदार यांच्या हस्ते ज्योतिषांना गौरविण्यात येणार आहे.
या कार्यशाळेचा जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमींनी लाभ घ्यावा. कार्यक्रमस्थळी पुस्तके उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमास प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य राहणार आहे. ‘ज्योतिषशास्त्राच्या एका नियमात जगातील बहुसंख्य व्यक्ती' या पुस्तकाची मूळ किंमत 300 रुपये आहे. हे पुस्तक सवलतीच्या दरात फक्त 150/- रुपयात कार्यक्रमस्थळी मिळणार आहे. ‘ज्योतिषशास्त्राची प्रचिती' या पुस्तकाची मूळ किंमत 300 रुपये आहे. हे पुस्तक हा सवलतीच्या दरात फक्त 150/- रुपयात कार्यक्रमस्थळी मिळणार आहे. ही सवलत फक्त कार्यशाळेपुरतीच मर्यादित आहे. ही दोन्ही पुस्तके ज्योतिषांसाठी संग्राह्य अशी आहेत.