गीतेच्या गाभाऱ्यात

18 Nov 2022 15:19:46
 
 
पत्र अठ्ठाविसावे
 

Bhagvatgita 
 
जगातील निरनिराळ्या तज्ज्ञांची मते पाहून तुझी खात्री हाेईल की गीतेने कामाबद्दल जे विचार मांडले आहेत तेच समाजाच्या दृष्टीने तारक आहेत.काम वाफेसारखा आहे. वाफ काेंडून ठेवून नियमाने बद्ध करून तिचा उपयाेग केला तर फार उपयाेगी आहे. तसे न करता तिला मु्नतसंचार करू दिला तर ताे घातक आहे.संयमित काम तारक आहे. तर मु्नत काम मारक आहे.
 
*** तू जाे पुढचा प्रश्न विचारला आहेस त्या बाबतीत तुला एक मजेशीर गाेष्ट सांगताे. ही गाेष्ट वाचून तुझी खात्री हाेईल कीत्या गाेष्टीपेक्षा जास्ती संयु्नितक दुसरी गाेष्ट सांगून देण्यात येते. ही गाेष्ट जर संयु्नितक असेल तर प्रश्न विचारणाऱ्याला आपणाला बराेबर उत्तर मिळाले म्हणून आनंद हाेताे. मी जी तुला मजेशीर गाेष्ट सांगणार आहे ती अशी आहे.एकदा पंडित जवाहरलाल नेहरू येरवड्याच्या वेड्याच्या इस्पितळाला भेट देण्यास गेले हाेते. त्या ठिकाणी वेडे सुधारतात हे दाखविण्यासाठी डाॅ्नटरांनी बरा हाेत असलेल्या एका राेग्याला बाेलावले व म्हटले- ‘रंगनाथ, या बड्या पाहुण्यांना सारं इस्पितळ दाखवून आण.’ रंगनाथ म्हणाला- ‘बरं आहे डाॅ्नटर साहेब. मी हे काम उत्तम करताे.’ त्याने इस्पितळ दाखविण्यास सुरुवात केली व नेहरूंना विचारले- ‘आपले नाव काय?’ नेहरू म्हणाले.
‘अरे, ज्याला जवाहरलाल नेहरू म्हणतात ताे मीच आहे.’ रंगनाथने नेहरूंच्याकडे पाहिले. त्यांच्या हातावर टाळी मारली व म्हटले- ‘अरे, काही काळजी करू नकाेस. तू त्याच इस्पितळात रहा. खात्रीनं बरा हाेशील. कारण मी त्या इस्पितळात प्रथम आलाे तेव्हा काेण हाेताे तुला माहीत आहे?’ नेहरूंनी विचारले- ‘तेव्हा काेण हाेतास?’ रंगनाथ म्हणाला- ‘अरे, तेव्हा मी महात्मा गांधी हाेताे.’
 
*** तू पत्रात लिहितेस- ‘विलेपार्ले येथे मी गेले असता मालिनी मला म्हणाली- ‘अग आई! दादांच्यामुळे तू देखील कृष्णमय झाली आहेस.तुला वाटते की कृष्ण हा समाजाचा सर्वश्रेष्ठ नेता आहे. अग आई! हल्ली सामाजिक मानसशास्त्राच्या चष्म्यातून नेत्याबद्दल विचार करतात. तुला सामाजिक मानसशास्त्र माहीत आहे का? सामाजिक मानसशास्त्राच्या चष्म्यातून कृष्णाचे माेठेपण तू मला सांगशील का?’ अहाे! मला हे कसं सांगता येणार? मुलांना आपली आई फार शहाणी आहे असं वाटतं. तुमच्यामुळे कृष्णाबद्दल मी खूप वाचते; पण मालिनीच्या प्रश्नाचे उत्तर मला देता आले नाही.अब्राहम लिंकन लहान हाेता. त्याला पुस्तक वाचताना काही नडलं की ताे आईला विचारायचा. आई अडाणी हाेती.
Powered By Sangraha 9.0