गीतेच्या गाभाऱ्यात

15 Nov 2022 13:38:16
 
 
पत्र अठ्ठाविसावे

Bhagvatgita 
 
प्रिय जानकी, तुझे पत्र पावले.तू विचारतेस की गीतेतील काेणता अर्धा श्लाेक सर्वाेत्कृष्ट आहे? तसंच पाहिलं तर गीतेतील सारेच, श्लाेक चांगले आहेत. रसिक प्रियकराला वाटतं की- विलाेल विभ्रमांनी मला भुरळ पाडणाऱ्या प्रेयसीच्या मादक नेत्रकटाक्षांना सर्वाेत्कृष्ट स्थान देऊ? का तिच्या पुष्ट स्तनांना? का तिच्या काळ्या कुळकुळीत केशसंभाराला? का तिच्या धुंद करून साेडणाऱ्या मानेच्या माेहक हालचालीला? कुणाला सर्वाेत्कृष्ट स्थान देऊ याबद्दल त्याचा निश्चय लवकर हाेत नाही.गीतेच्या श्लाेकांचे असेच आहे. काेणत्या श्लाेकाला सर्वाेत्कृष्ट स्थान द्यावयाचे त्याचा निश्चय लवकर हाेत नाही.काेणत्या अर्ध्या श्लाेकास सर्वाेत्कृष्ट स्थान द्यावयाचे याचा निश्चय करणे तर सुतराम कठीण आहे.साहित्यात एक सुंदर सुभाषित आहे काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुंतला। तत्रापि च चतुर्थाेंऽक: तत्र श्लाेक चतुष्टयम्।। काव्यप्रकारात नाटक रम्य, नाटकात शाकुंतल नाटक रम्य, शाकुंतल नाटकात चाैथा अंक रम्य व त्या अंकात चार श्लाेक रम्य.
 
याच चालीवर असे म्हणता येईल की, सर्व शास्त्रात अध्यात्मशास्त्र रम्य, अध्यात्मशास्त्रात गीता रम्य, गीतेमध्ये अठरावा अध्याय रम्य व त्या अध्यायातईश्वर: सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।। हा अर्धा श्लाेक सर्वांत रम्य.एका कवीने म्हटले आहे की फश्लाेकार्धेन प्रवक्ष्यामि यदु्नतं ग्रंथकाेटिभि:। ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवाे ब्रह्मैव नापर:।। काेट्यवधी ग्रंथात जे मी म्हटले आहे ते मी अर्ध्या श्लाेकांत सांगताे, ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे व जीव ब्रह्म एकच आहेत.याच चालीवर असे म्हणता येईल कीश्लाेकार्धेन प्रवक्ष्यामि यदु्नतं केशवेन वै। ईश्वर: सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।। (काेट्यवधी ग्रंथात जे म्हटले आहे ते मी अर्ध्या श्लाेकात सांगताे. ईश्वर सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात आहे.) तू असे लक्षांत घे कीईश्वर आपल्या अंत:करणात आहे हे आपल्याला कळलं म्हणजे गीता समजली.
 
गीतेत ज्ञान श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ, याबद्दल लाेक खुशाल वादविवाद कराेत, पण आपण वरच्या पायरीवर गेलाे म्हणजे आपणाला कळून येते कीज्ञान, कर्म व भ्नती एकच आहेत.पाचव्या अध्यायात भगवान म्हणतातज्ञान व कर्म एकच आहेत हे ज्याला कळले ताे शहाणा.
(एकंसांख्यं च याेगं च य: पश्यति स पश्यति।) तू असे लक्षांत घे की ज्याप्रमाणे ज्ञान व कर्म एकच आहेत त्याप्रमाणे ज्ञान व भ्नती एकच आहेत.गीतेला जे ज्ञान अपेक्षित आहे त्याची व्याख्या करताना अठराव्या अध्यायात- कळसाध्यायात - असे म्हटले आहे की- सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी ईश्वरी रूप पाहणे म्हणजे सात्त्विक ज्ञान भ्नतीची व्याख्या तुला माहीत असेल
Powered By Sangraha 9.0