शिल्पाचे सर्वजण काैतुक करतात.पण, ते शिल्प घडविणाऱ्या शिल्पकाराचे नाव कालांतराने विसरले जाते. आपल्या देशात एका शिल्पकाराचे मंदिर आहे.ते शिल्पकाराचे जगातील एकमेव मंदिर आहे. रामप्पा नावाच्या शिल्पकाराचे हे मंदिर तेलंगणा राज्यातील मुलुगु जिल्ह्यात असून, या रामप्पा मंदिराला युनेस्काेकडून हेरिटेज दर्जा मिळाला आहे.रामप्पा मंदिर सन 1213 मध्ये काकतीय राजघराण्यातील राजा गणपती देव यांच्या आज्ञेवरून त्यांचा सेनापती आर. इंद्रदेव यांनी बांधले. 6 फूट उंच ताऱ्याच्या आकाराच्या ओट्यावर हे अतिभव्य मंदिर बांधण्यात आले आहे. 809 वर्षांपूर्वी बांधलेले हे मंदिर आजही भ्नकमपणे उभे आहे. प्रभावशाली आकर्षक प्रवेश द्वार, 1000 खांब, दगडी भिंती, त्यावर पाैराणिक चित्रे व नर्तकीच्या कलाकृती अंकित करण्यात आल्या आहेत.
रामप्पांच्या शिल्पकारीचा हे मंदिर अद्भुत नमुना आहे. या मंदिरात एकाच छताखाली भगवान शंकर, विष्णू आणि सूर्याची मूर्ती आहे. या मंदिराला त्रिकुट्यलम (त्रिदेव) मंदिर असेही म्हणतात. साधारणपणे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव आहेत; पण ब्रह्मदेवाला त्याची पत्नी ब्रह्माणी हिने शाप दिल्यामुळे पृथ्वीवर पुष्कर तीर्थ व्यतिर्नित ब्रह्मदेवाचे काेठेही मंदिर नाही.ब्रह्मदेवाच्या जागी सूर्याची मूर्ती असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. जगाचा प्रवास करायला निघालेल्या मार्कपाेलाेने या मंदिराचे काैतुक करताना रामप्पा मंदिर मंदिरांच्या आकाशगंगेतील तेजस्वी तारा असे वर्णन केले हाेते. देवाच्या मूर्ती घडविणाऱ्या शिल्पकार रामप्पाचे हे मंदिर देशाचे सर्वाेत्तम वैशिष्ट्य गणले जाते.