ओशाे - गीता-दर्शन

10 Nov 2022 17:17:15
 
 

Osho 
 
येशूंनी क्षणभर थांबून हाक मारली, ‘ए दादा’ शेतकऱ्याने येशूंना पाहिले आणि लगेच ताे बैलांना उद्देशून म्हणाला, ‘पहा बैलांनाे मी या शिव्या तुम्हाला सांगितल्या-अशा शिव्या मी तुम्हाला पूर्वी देत हाेते. या शिव्या मी तुम्हाला आत्ता देत नाहीये. पूर्वी देत हाेताे. आता बाबांनाे जरा जल्दी पळा बघू.’ येशूंनी त्याला म्हटले, ‘ए बाबा तू नुसते बैलांनाच फसवत नाहीस, मलाही फसवत आहेस आणि तू मला फसवलस तर फारसं काही बिघडत नाही, पण तू स्वत:लाच फसवत आहेस.शेवटी फसवणूक तुझ्यावरच येऊन आदळणार.कदाचित, मी पुन: तुझ्या गावात कधीही येणार नाही.
 
मी मान्यच करून टाकताे की तू बैलांना शिव्या देतच नव्हतास, त्यांना फ्नत आठवण देत हाेतास, बाबा तू मला फसवलेस तर काही बिघडत नाही, बैलांना फसवलेस तरी बिघडत नाही, पण तू अवश्य स्वत:लाच फसवत आहेस.’ पण जेव्हा काही वाईट करताे ते दुसऱ्या काेणाचतरी असतं ही आपली भ्रांती असते.मुळात आपण आपलेच चांगलं वा वाईट करत असताे. अंतिम परिणाम, शेवटी फळे आपल्यालाच भाेगायला लागतात. आपण जे काही पेरत आहाेत त्याची जी फळे येतील, ती आपल्याच वाट्याला येणार आहेत. इंचाइंचाचा हिशेब आहे. या जगात बेहिशेबी असा एकही व्यवहार नसताे.कृष्ण म्हणताे-आपणच आपले शत्रू बनून जाताे. त्या क्षणी आपण आपलेच शत्रू हाेताे जेव्हा आपण असे काही करताे. ज्यामुळे आपण आपल्यालाच दु:खात टाकताे.
Powered By Sangraha 9.0