फिडिंग अमेरिका नेटवर्कमुळे स्पष्ट झालेली स्थिती; फूड पेन्ट्रीसमाेर रांगा स्वत:ला जगातील सर्वांत समृद्ध देश समजणाऱ्या अमेरिकेत महागाईचा कळस झाला असून, सध्या कमीतकमी अडीच काेटी लाेकांना पाेटभर जेवणसुद्धा मिळत नाही.त्यामुळे फुकट पण पाेटभर जेवण मिळावे यासाठी गरजू लाेक आपल्या आलिशान कारमधून तबिता फूड पेन्ट्रीसमाेर रांगा लावतात. 2020 च्या तुलनेत यंदा अमेरिकेची खाद्यस्थिती खूपच खराब झाली आहे.कॅरी विलकाॅ्नस नावाची महिला तिच्या आलिशान कारमधून पेसन उटा येथील तिच्या घरापासून थाेड्या अंतरावर असलेल्या तबिता फूड पेन्ट्रीवर गेली. त्या वेळी तेथे टाेयाेटा, हाेण्डा, सीडाॅन कारची नवी माॅडेल्स पाहून ती आर्श्चयचकित झाली. या आलिशान कारमध्ये लाेक आपल्या मुलाबाळांसह आले हाेते.
कॅरी विलकाॅ्नसप्रमाणेच हे धनाढ्य लाेकसुद्धा जेवण फुकट मिळविण्याच्या आशेने आले हाेते. काेराेना काळात कॅरीच्या पतीची नाेकरी गेली हाेती. आता या दाेघांनाही नवी नाेकरी मिळाली असली, तरी पुरेसा पगार मिळत नाही.महागाई वाढतच आहे. त्यामुळे अशा लाेकांना घरखर्च भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे असे लाेक जेवण फुकट मिळावे यासाठी फूड काेर्ट, पेन्ट्रीसमाेर रांगा लावत आहेत. तबिता फूड पेन्ट्री पूर्वी दर आठवड्याला 130 कुटुंबांना माेफत जेवण देत हाेती. आता ही संख्या 200 झाली आहे.2020 मध्ये काेराेनाची पहिली लाट आली. त्या वेळी अचानक बेराेजगारी वाढल्यामुळे अमेरिकेत खाद्य असुरक्षाही वाढली.
या वेळी खाण्या-पिण्याच्या वस्तू आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाट वाढल्यामुळे लाेकांसमाेर माेठी समस्या निर्माण झाली आहे.एक वर्षापूर्वीच्या तुलनेत खाद्यपदार्थ 10.4% महाग झाले.फूड बँकांना मिळणारी आर्थिक मदत कमी झाली.जनगणना ब्युराेनुसार, गेल्या महिन्यात अडीच काेटी लाेकांना पाेटभर जेवणसुद्धा मिळाले नाही. ही संख्या 2020 नंतर सर्वांत जास्त आहे. याचा अर्थ असा की, 2020 च्या तुलनेत यावर्षी स्थिती जास्तच खराब झाली आहे. अमेरिकेतील फूड बँकांचे सर्वांत माेठे नेटवर्क ‘फिडिंग अमेरिका’चे म्हणणे असे की, या नेटवर्कशी संलग्न 85% संघटनांनी सांगितले की, मे-जून दरम्यान बँकेतून कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
50% फूड बँकांनी स्थिती वाईट असल्याच कळविले. यासाेबतच दान म्हणून मिळणारी र्नकम 35% कमी झाली आहे. फिडिंग अमेरिका नेटवर्क 200 फूड बँक आणि 60 हजार फूड पेन्ट्रींना मदत करते.जून-जुलै महिन्यात स्थिती 2020 सारखी झाली. गेल्या 30 दिवसांमध्ये 5 पैकी एका प्राैढ व्य्नतीने सांगितले की, मला पुरेसे जेवण मिळाले नाही.नाेकरी करणाऱ्या 17.3% लाेकांनी सांगितले की, आमच्याकडे जेवणाची टंचाई आहे. ही संख्या 2020 मध्ये 16.3% हाेती.