गीतेच्या गाभाऱ्यात

01 Nov 2022 15:46:41
 
पत्र सव्वीसावे
 

Bhagvatgita 
 
‘तुम्हाला माहीत असेल की - एकदा एका बड्या मासिकाने बड्या बड्या लाेकांना विचारले हाेते- पुढल्या जन्मी तुम्हाला काय व्हावेसे वाटते? आपले तत्त्वज्ञान म्हणजे की मु्नती अथवा माेक्ष मिळाला म्हणजे पुन्हा जन्म नाही. आपल्या तत्त्वज्ञानाचे अंतिम ध्येय म्हणजे माेक्ष. असे असूनही तुकारामसारखे संत मु्नतीला किंमत देत नाहीत व पुन्हा जन्मास येण्याची भाषा बाेलतात.ते म्हणतातन लगे मु्नित संपदा। संतसंग देई सदा।। तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावे आम्हासी।। काही बायकांना सुप्त इच्छा असते की, पुढल्या जन्मी पुरुषजन्म यावा. मला वाटते की, काही पुरुषांना देखील पुढल्या जन्मी बायकांचा जन्म यावा, अशी सुप्त इच्छा असेल.रामकृष्ण परमहंस म्हणत असत की पुढल्या जन्मी आपल्याला बायकांचा जन्म यावा.
 
समजा- तुम्हाला कृष्ण प्रसन्न झाला व म्हणाला- मी तुझ्यावर प्रसन्न झालाे आहे. पुढल्या जन्मी मी तुला बायकांच्या जन्माला घालणार आहे. पुढल्या जन्मी तू स्त्री हाेशील. तुझ्या ज्या ज्या इच्छा असतील त्या तू खुशाल मागून घे, मी त्या जन्मी पुऱ्या करीन. मात्र तुला स्त्री व्हावे लागेल हे लक्षांत असू दे.’ असं झालं, तर तुम्ही काय मागून घ्याल? एका कृष्ण भ्नताच्या- एका गीता भ्नताच्या - इच्छा कशा धावतात ते जाणून घेण्यास मी फार उत्सुक आहे.तुम्ही हा प्रश्न हसण्यावारी नेऊ नका. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. आता देखील नितांत प्रेमाने ह्या प्रश्नाचे माेकळेपणाने उत्तर द्या.-’ ठीक आहे. आलिया भाेगासी असावे सादर.कृष्णाला मी म्हणेन- ‘कृष्णा! माणसाची जन्मजात खाेड जात नाही.
 
तू एवढा माेठा देव पण तुझा देखील खाेड्या करण्याचा स्वभाव जात नाही. मला पुढल्या जन्मी स्त्रीजन्माला घालून गम्मत करण्याची तुला लहर आली आहे. पण माझे साताजन्माचे भाग्य फळाला आले आहे कारण माझ्या साऱ्या इच्छा तू पुढल्या जन्मी पुरवणार आहेस.कृष्णा! मला पुढल्या जन्मी भारतात पवित्र कुळात कृष्णभ्नतीने न्हाऊन निघालेल्या आईबापांच्या पाेटी जन्म येऊ दे. माझे नांव ‘गीता’ असे ठेवण्यात यावे.मी खूप खूप शिकावे. तत्त्वज्ञान हा विषय घेऊन मी डाॅ्नटर (डी.लिट) व्हावे, पण लग्नाच्या फंदात न पडता कृष्णाचा संदेश साऱ्या जगाला सांगावा हे माझ्या जीवनाचे ध्येय व्हावे.कृष्णा ! ह्या ध्येयाने प्रेरीत हाेऊन साऱ्या जगभर मी सारखा प्रवास करावा, कृष्णा! तू साैंदर्याचा राजा आहेस साैंदर्याच्या बाबतीत मी रती असूनही माझ्याकडे पाहून लाेकांना विर्नती उत्पन्न व्हावी व प्रेमाच्या दरबारात माझ्याकडे पाहाणाऱ्या लाेकांना मातृप्रेमाचा साक्षात्कार व्हावा.
Powered By Sangraha 9.0