सर्व जीवमात्रात ईश्वराला पाहून त्यांच्याशी अतूट नाते जाेडणे ही साधी गाेष्ट नाही. संसारात अडकलेला जीव मी व अहंकारामुळे स्वत:च स्वत:चा राहत नाही. जाे स्वत:चा राहात नाही ताे इतरांचा हाेईलच कसा? कुटुंबातल्या सदस्यांशी, मित्रपरिवाराशी ज्याला अतूट नाते निर्माण करता येत नाही, त्याला समाजाशी अतूट नाते निर्माण करता येणे अशक्य असते.इतरांशी अतूट नाते निर्माण करण्यासाठी ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, काम, क्राेध, वासना आदींना काढून टाकायला हवेसमाजाशी आपले नाते अतूट आहे, हा दाखविण्याचा किंवा केवळ सांगण्याचा विषय नाही, तर हा विषय प्रत्यक्ष अनुभवण्याचा व अनुभूती देण्याचा विषय आहे.
ही अनुभूती आपण तेव्हाच समाजाला देऊ शकू जेव्हा आपण आपणाला खऱ्या अर्थाने ओळखू शकू. आपणाला आपली खरी ओळख हाेण्यासाठी आपणाला ताे भेटावा लागताे, जाे स्वत:ला खऱ्या अर्थाने ओळखताे. स्वत:ची खरी ओळख हाेणारे अत्यंत नगण्य आहेत.धावपळीच्या जीवनात अशा महात्म्यांचा शाेध लागणे अत्यंत कठीण आहे. पण गाथा, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्याने ज्ञानाेबा-तुकाेबांचा सहवास मिळविला त्याला स्वपरिचय हाेणे व समाजाशी अतूट नाते निर्माण करणे अवघड नाही. जय जय राम कृष्ण हरी ज्ञानदास.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448