पुराणकाळापासून इतिहासकाळापर्यंत आणि अगदी आजही कामविचार आणि स्त्रीमाेहापायी भलेभले तपस्वी, विद्वान, राजकारणी आणि कलाकारही कसे सर्वस्वी पराधीन हाेऊन जातात याची असंख्य उदाहरणे आहेत आणि ती आपल्या भाेवताली आपणाला देशांत व परदेशांतही दिसत असतात.श्रीसमर्थ या चारही समासातून जे सामान्य माणसाचे गुणदाेषवर्णन सांगत आहेत ती कथा आता आणखी एक वळण घेते. त्या माणसाची परमप्रिय पत्नी अकस्मात मरून जाते. ताे दु:खाने वेडापिसा हाेताे. माेठमाेठ्याने शाेक करीत ताे म्हणताे की, माझे सर्वस्व बुडाले आणि ताे संन्यास ेण्याचा आणि जीव देण्याच्या गाेष्टी करू लागताे.
पाहणाऱ्यांना वाटते की, या दु:खावेगाने हा आता जगणेही अवघड आहे; पण काही काळ जाताच त्याच्या मनातील कामवासना पुन्हा जागृत हाेते आणि हा जाेगी बनायला निघालेला माणूस पुन्हा दुसरे लग्न करताे. त्या द्वितीय पत्नीच्याही ताे तीव्रतेने प्रेमात पडताे आणि मग पूर्वीप्रमाणेच तिच्यात गुंतून जाताे. म्हणजे थाेड्नयात पत्नीप्रेमामध्ये बहुसंख्य माणसांची प्रेमापेक्षा वासनाच जास्त असते आणि तिच्यावर विवेकाने अंकुश लावणे महत्त्चाचे आहे हेच श्रीसमर्थांना ठसवावयाचे आहे.
-प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299