तरुणसागरजी

31 Oct 2022 15:22:31
 
 

Tarunsagarji 
 
दरराेज सकाळी ही एक छाेटीशी प्रार्थना म्हणत चला : हे प्रभू! माझे पाय लुळ्या-पांगळ्यांचे पाय बनाेत. माझे डाेळे आंधळ्यांचे डाेळे बनाेत.माझे हात निराधारांचे आधार बनाेत. दु:ख आणि शाेकात बुडालेल्या व्यक्तींचे सांत्वन करण्याचे काम माझ्या जीभेकडून हाेऊ दे. एखाद्या गरीब आणि राेग्याची सेवा करताना माझा घाम गळाे, काेणी पाहुणा माझ्या घरातून उपाशी तापाशी जाऊ नये. हे प्रभू! आपल्या या बाळाला सतत यासारखे बनवून ठेव. प्रभू! माझा नमस्कार स्वीकार करावा!
Powered By Sangraha 9.0