ओशाे - गीता-दर्शन

31 Oct 2022 15:24:50
 
 

Osho 
 
 
त्या व्य्नतीची कामवासना शुद्ध हाेऊन रामाकडे ताेंड करून त्या दिशेला गतिमान हाेईल. तिची कामवासना विलिन हाेऊन जाईल.
कारण ती निसर्गाची गरज आहे, व्य्नतीची गरज नाहीये. आपण मरण्याआधी निसर्ग एवढे काम आपणाकडून करून घेऊ पाहताेकी आपण आपली जागा घेण्यासाठी कुणालातरी निर्माण करावे. बस्स. त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. खाेलवर पाहिले तर ती आपली गरज अजिबात नाही. पण इंद्रियानी भरकटलेला माणूस बराेबर याच्या उलट विचार करील, ताे एखाद्या वेळी उपाशी राहायला तयार हाेईल पण कामाबाबत थांबायला राजी हाेणार नाही. ताे भूक साेडील. धन साेडील, स्वास्थही साेडील पण कामवासनेच्या मागे लागलेलाच राहील. हा सारा इंद्रिये विकृत झाल्याचा परिणाम आहे.जसजशी इंद्रिये स्वाभाविक हाेतील, सुकृत हाेतील.
 
सहज हाेतील तसतशा व्य्नतीच्या ज्याज्या गरजा आहेत त्या-त्या सरळ हाेत जातील आणि ज्या व्य्नतीच्या गरजा नाहीत त्या नाहीशा हाेऊन जातील. अशा व्य्नतीच्या कर्माचे काय हाेईल? त्याची कर्माबद्दल जी आस्नती हाेती ती नाहीशी हाेईल. पण कर्म बंद हाेणार नाही. आणि जेव्हा कर्माबद्दलची आस्नती नाहीशी हाेईल. तेव्हा चुकीची कर्मे रामराम म्हणतील आणि जी रास्त कर्मे आहेत ती माेठ्या ऊर्जेने सक्रिय हाेतील.हळूहळू व्य्नतीच्या जीवनात फ्नत शुभकर्मे राहतील आणि अशुभ कर्मे नाहीशी हाेतील. आज इतकंच. परंतु पाच मिनिटे थांबा. माझे संन्यासी पाच मिनिटे, येथे गातील, नाचतील. आपणापैकी ज्यांना यात सहभागी व्हायचं आहे, त्यांनी सहभागी व्हावे. पण जे नुसतेच बसून आहेत, त्यांनी निदान टाळ्या वाजवाव्या आणि गाण्यात साथ द्यावी. या संकीर्तनाचा अपूर्व प्रसाद घ्यावा व मग आपण निराेप घेऊ या.
Powered By Sangraha 9.0