वाच्यार्थ: नदीच्या किनाऱ्यावरील झाडे, दुसऱ्याच्या घरात राहणारी सुंदर स्त्री, मंत्रिमंडळाशिवाय राजा इ. लवकरच नष्ट हाेतात, यात मुळीच शंका नाही.
भावार्थ : विनाशमूलक परिस्थिती.
1. नदीच्या किनाऱ्यावरील वृक्ष- वृक्ष वनात, बागेत, शेतात जिथे खतपाणी मिळेल त्या जमिनीत वाढतात; नदीच्या किनाऱ्यावर तर वृक्ष वाढतातच वाढतात; पण या वृक्षांचे आयुष्य ार थाेडे असते. कारण नदीचे पात्र नेहमी बदलत राहते आणि जास्त पाऊस आल्यास पूर येऊन नदीतीरी असणारे वृक्ष ज्यांची मुळे मुळातच (ओल जास्त असल्याने) ारशी घट्ट राहू शकत नाहीत ती उन्मळून पडतात.