प्रत्येक बालक सशक्त असण्याबराेबरच या मुलांना सक्षम व काैशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचे पर्व घेऊन येवाे अशी मनाेकामना महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लाेढा यांनी व्यक्त केली. माटुंग्यातील बालगृहातील मुलांसमवेत दिवाळी साजरी करताना लाेढा बाेलत हाेते. माटुंगा येथील द बेहेरामजी जीजीभाॅय हाेम फाॅर चिल्ड्रेन व श्रद्धानंद बालगृह या संस्थांना त्यांनी भेट दिली. या वेळी महिला व बालविकास आयुक्त आर. विमला, मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शाेभा शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित हाेते.
राज्यातील प्रत्येक बालकाला निरामय आराेग्य लाभावे, यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध याेजना राबवण्यात येत आहेत. बालकांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून शासन यापुढे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेणार असल्याचे लाेढा यांनी सांगितले. या संस्थेत एकूण 102, श्रद्धानंद महिला वसतिगृह येथे 128 मुली आहेत. या मुलांच्या प्रवेश प्रक्रिया, माेफत शालेय शिक्षण, मुलांसाठी विशेष शिक्षणाची व्यवस्था, शैक्षणिक व मनाेरंजनात्मक सहलीचे आयाेजन यांसारख्या संस्थेच्या उपक्रमांची माहिती विमला यांनी दिली.