जीवन सहजतेने जगा, गुंता याेग्य नव्हे

20 Oct 2022 13:08:38

saint
अनेकजणांना वाटते की, धूम्रपानाची सवय सुटायला हवी, पण ती सुटतच नाही. त्यासाठी एवढे गंभीर व्हायचे काय कारण? आता एखादेवेळी केला धूर आत-बाहेर तर अशी काय अडचण झाली आहे. तसाही हवेत एवढा धूर झाला आहे की जणू सारेच धूम्रपान करीत आहेत.नुकतेच न्यूयाॅर्कचे निरीक्षण झाले. न्यूयाॅर्कच्या हवेत एवढे विष आहे की, तेवढ्या विषात माणूस जिवंत राहूच शकणार नाही. तरीही माणूस जिवंत आहे. आत्तापर्यंत हे माहीतच नव्हते की, जेवढे विष माणूस मरण्यासाठी हवे, त्यापेक्षा कैकपट जास्त विष हवेत आहे. विशेषत: न्यूयाॅर्क, लाॅस एंजल्स, मुंबई, काेलकात्ता यासारख्या महानगरांमध्ये.
 
तरीही माणूस जगत आहे. यासाठी जीवन एवढे गांभीर्याने घेऊ नका. पण काहीजण छाेट्या छाेट्या गाेष्टी गांभीर्याने घेतात. त्याचे कारण काय आहे? त्याचे कारण हे नाही की ते धार्मिक आहेत. त्यांचा अहंकार दुखावताे. या अहंकारामुळेच सारे गुंते वाढतात अन्यथा जीवन सरळ असायला हवे. आता काेणी सांगताे की, माझा चहाच सुटत नाही. तसा देवही चहा पिताे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा देवाला भेटाल तर ताे विचारेल की, चहा पिणार की काॅफी.तुम्हाला प्रश्न पडेल की, आता काय करावे. कारण तुमचा अहंकार दुखावला जात असताे.सारे बाैद्ध भिक्षू जगभर चहा पितात. काही अडचण नाही.
 
खरेतर चहाचा शाेधही बाेधिधर्म या बाैद्ध भिक्षुंनीच लावला. बुद्धांच्या बराेबरीच्या भिक्षूने चहाचा शाेध लावला यावरूनच दिसून येते की, देवही चहा पित असेल.बाेधिधर्म खूप हिमतीचा माणूस हाेता. त्याने आपल्या शिष्यांना सांगितले की, चहा अवश्य प्या. कारण जेव्हा तुम्ही चहा प्याल तेव्हा तुम्हाला झाेप येणार नाही आणि ध्यानात सर्वांत माेठा अडथळा झाेपेचाच आहे.अर्थात छाेट्या छाेट्या गाेष्टींचा बाऊ करू नका.त्यामुळे आपल्या साध्या सरळ जीवनात अडथळे निर्माण करू नका. अन्यथा यातच सडून जाल.
Powered By Sangraha 9.0