जरा खाेलवर विचार करून सांगा बघू आपणाला कधीतरी भूक लागते का ते? आपण म्हणाल नक्कीच, राेजच मला भूक लागते. तरी पण मी आपणाला सांगताे, आपणाला भूक कधीच लागत नाही. आपणास भ्रांती झालेली असते. भूक तर शरीरालाच लागते आपल्याला तर फक्त हे कळते की शरीराला भूक लागलेली आहे. पण आपण इतक्या बारकाईने सत्याचे दर्शन घेत नसताे. सरळ सांगून टाकता की मला भूक लागली आहे. आपण ारसा विचारच करीत नसताे. भूक फक्त शरीराला लागते.आपणाला फक्त शरीराला भूक लागली आहे, याची जाणीव हाेते. शरीराला भूक लागल्याचा फक्त बाेध आपल्याला हाेताे. पण आपण शरीरालाच ‘मी’ असे मानता, म्हणून ‘मला भूक लागली आहे’ असे म्हणता. आता जेव्हा भूक लागेल तेव्हा जरा बारकाईने पहा.
भूक लागली आहे असे जिला वाटते ती चेतना वेगळी, अन् भूक जिथे लागली ते आपले शरीर वेगळे-या दाेन्ही वेगवेगळ्या गाेष्टी आहेत, एकच नाहीत हे लक्षात येईल. जेव्हा पायाला ठेच लागते तेव्हा आपल्याला ठेच लागलेली नसते. आपल्याला फक्त जाणीव हाेत असते की पायाला ठेच लागलेली आहे. पण भाषेचे माेठे भ्रम उभे केलेले आहेत. बाेलताना आपण थाेडक्यात म्हणताे, मला ठेच लागली पण ही जर नुसतीच भाषेची चूक असेल तर ठीक हाेते.पण खाेलवर चेतनेची चूक हाेऊन जाते.जेव्हा आपण तरुण असता, तेव्हा आपण म्हणता ‘मी तरुण आहे’ म्हातारे झाल्यावर म्हणता ‘मी म्हातारा झालाे.’ तेथेही तिच चूक हाेते. ताे जाे भूकेचा भ्रम आहे ताे पसरत जाते. आपण थाेडेही म्हातारे झालेला नाहीत.