वाच्यार्थ : लाड केल्याने दाेषांचे बाहुल्य वाढते; तर (चूक केल्यावर) मारले असता गुणांची वृद्धी हाेते. म्हणून मुलाला आणि शिष्याला कठाेर शिक्षा करणे (चूक सुधारण्यासाठी) याेग्य ठरते.
भावार्थ : उत्तम गुणांसाठी चूक झाल्यास शिक्षा करणे कधीही याेग्य. उत्तम गुणांचे संस्कार करण्यासाठी प्रसंगी मारही देणे याेग्य आहे. लहान मुलांना खेळणे, हुंदडणे आवडते. शिस्त आवडत नाही; परंतु नियम किंवा शिस्त असल्याशिवाय काही शिकताही येत नाही.
1 लालन : माता-पिता तद्वतच आपल्या शिष्याला पुत्रवत समजणारा गुरू मुलांना प्रेमाने वाढवितात. त्यांनी चुका केल्यास, शिकण्याचा आळस केल्यास, प्रेमापाेटी त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात; परंतु काही मुले याचा गैरफायदा घेतात आणि त्यांच्या चुका सुधारतच नाहीत. मग अनेक दाेष त्यांच्यात वाढीला लागतात.