पत्र पंचविसावे
तुला हे पत्र मी लिहित आहे. त्या महान कर्णाचं भावानं भरलेलं, भ्नतीनं ओथंबलेलं ते कृष्णप्रेम पाहून मला एकदम गहिवरून आलं. मी कृष्णाला नमस्कार केला व म्हटलं- कृष्णा! तुझा छंद हाच माझ्या जीवनाचा सुगंध.असाे! ‘‘भारते सारं उद्याेगपर्वम्’’ असे म्हणून महाभारतातील ज्या पर्वाला जास्तीत जास्त महत्त्व देण्यात येते ते उद्याेगपर्व तू समजून घे म्हणजे गीतेचं तत्त्वज्ञान तुला समजेल.तूलक्षात ठेव कीकृष्णाचे स्मरण म्हणजे दुर्बुद्धीचे मरण व गीतामय जीवन म्हणजे धन्य जीवन.
गीतेच्या गाभाऱ्यांत सात्त्विक ज्ञानाची समई लावून भ्नतीच्या गंधाक्षतांनी, कर्तव्यकर्माच्या पुष्पांनी आपण कृष्णाची पूजा करूया व मानवी जीवन मंगल करणारा तीर्थप्रसाद साऱ्या लाेकांना वाटूया.तुझा राम पत्र सव्वीसावे प्रिय जानकी, तुझे पत्र पावले, तू आपल्या पत्रात संस्कृतीबद्दल बरेच प्रश्न विचारले आहेस. गीतेच्या गाभाऱ्यात संस्कृती समजून घेणे नितांत आवश्यक आहे. हे तुझे मतपटण्यासारखे आहे. तुझ्या प्रश्नांची थाेड्नयात उत्तरे अशीसंस्कृती म्हणजे संस्कार, मूळ स्थितीत इष्ट बदल असा काेशगत अर्थ आहे. प्रांझ बाेस ह्याने त्या बाबतीत तीन भाग पाडले आहेत.
(1) निसर्ग व मानव ह्यामधील संबंध
(2) मानवामानवामधील संबंध व
(3) निसर्ग व मानव त्यामधील संबंध व मानवामानवामधील संबंध ह्यामुळे मानवी मनात उत्पन्न हाेणाऱ्या प्रतिक्रिया.
खाेल विचार केला म्हणजे आपणाला कळून येते की- भाैतिक श्नतीचे नियमन करून ती मानवाच्या सुखासाठी राबवण्याची धारणा म्हणजे सुधारणा (Civilization) व मानवी जीवनावर संस्कार करून त्यातील पशुत्व नाहीसे करून त्याला देवत्वाप्रत नेण्याची कृती म्हणजे संस्कृती (Religion)जगांत पुष्कळ आश्चर्य आहेत पण आश्चर्यांचे आश्चर्य असे आहे की- मिसरी, सुमेरियन, अॅसिरियन, बॅबिलाेनियन अशा संस्कृती पार नष्ट झाल्या, पण फार प्राचीन अशी भारतीय संस्कृती अद्याप जिवंत आहे.पाश्चात्त्य विद्वानांना वाटते कीगीता सांगणारा कृष्ण जाेपर्यंत भारताला स्फूर्ती देत आहे ताेपर्यंत भारतीय संस्कृती अमर राहील.तू असे लक्षांत घे कीधर्म म्हणजे नव्हे, महाभारतामध्ये धर्माबद्दल बाेलताना कृष्ण म्हणताे.
धारणाद्धर्ममित्याहू: धर्माें धारयते प्रजा:। यत्स्याद्धारणसंयु्नतं स धर्म इति निश्चय:।। धर्म हा शब्द धृ धारण करणे ह्या धातूपासून निघाला असून धर्माने प्रजा धारण केली जाते. ज्याने सर्व प्रजेचे धारण हाेते ताे धर्म हे निश्चित आहे.भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा आहे संस्कार. संस्काराचा भर आहे माणुसकीवर.भारतीय संस्कृतीची इमारत चार पायावर उभारली आहे. ते चार पाय म्हणजे- (1) समाजधारणेचा विचार (2) माणुसकीचा आचार (3) उदात्त संस्कार व (4) दिव्य श्नतीचा आधार गीतेत सांगितल्याप्रमाणे आपल्या अंतरंगात दिव्य श्नती आहे. त्या दिव्य श्नतीच्या करंगळीचा आधार न घेता आपण आपल्या कितीही काठ्या घेतल्या तरी भारतीय संस्कृतीचा गाेवर्धन पर्वत आपण उचलू शकणार नाही.