सत्कर्माने ध्येय न्नकीच गाठता येते

19 Oct 2022 15:10:18
 
 

saint 
 
सध्याचा ऋतुबदलाचा काळ पुण्यकाळ आहे. ज्यामध्ये सत्कर्म श्रद्धाळूंना इहलाैकिक आणि पारलाैकिक दाेन्ही प्रकारचे सुख देताे. भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगितले की, माणसाला त्याच्या कर्माचे फळ अवश्य मिळते. ताे चांगले कर्म करीत असेल, तर त्याला चांगले फळ मिळते व वाईट कर्म करीत असेल, तर त्याला वाईट फळ भाेगावे लागते.सत्कर्म आपल्याला काम, क्राेध, लाेभ आणि माेह यासारख्या कुप्रवृत्तींपासून नेहमी दूर ठेवते. आपण लाेभापाेटी असे काहीही करू नये त्यामुळे आपल्या सत्कर्मांवर परिणाम हाेईल.
 
सत्कर्माने माणसात क्षमा, शील, धैर्य, दया, स्नेह, निर्बंध, आशा, नम्रता व निग्रहासारखे गुण आपाेआपच विकसित हाेतात.सत्कर्मामुळे माणूस क्राेध, लाेभ, ईर्ष्या, द्वेष, निराशा, संशय, माेह, आळस, अत्यारुढी व विवशता अशा दुर्गुणांपासून मु्नत हाेताे.अनैतिक, अनाचार व असंयमित विचाराने जे काही मिळते ते तात्पुरते असते. कर्म त्यांच्यासाठीच नेहमी फलदायी असतात जे सत्कर्मांवर विश्वास ठेवतात. स्वत:ची व समाजाची सेवा सत्कर्मानेच श्नय असते.याउलट कर्म करणाऱ्यांनी आज प्रगती मिळवली असली, तरी त्यांचे पतनही लवकरच हाेते.सत्कर्माने चालून ध्येय गाठणे थाेडे अवघड असले, तरी ध्येय अवश्य गाठता येते.
Powered By Sangraha 9.0