गीतेच्या गाभाऱ्यात

19 Oct 2022 14:52:10
 
 
पत्र पंचविसावे
 

Bhagvatgita 
 
कृष्ण खाेड्यात पडल्याबराेबर दात पडलेल्या सापाप्रमाणे पांडवांची परिस्थिती हाेईल. भर सभेत कृष्णाला बांधल्याबद्दल आंधळा कदाचित काेकलेल पण त्याला खुशाल काेकलू द्या.त्या म्हाताऱ्याकडे लक्ष द्यावयाचे नाही.दुर्याेधनाचा बेत सात्यकीला कळला. ताे सभेच्या बाहेर आला व कृतवर्म्याला म्हणालाप्रसंग बाका आहे. त्वरित सेना सज्ज कर व आपल्या सेनेसह सभाद्वारावर उभा रहा.
सात्यकी सभेमध्ये आला व त्याने दुर्याेधनाचा बेत कृष्णास कळवला. धृतराष्ट्राला उद्देशून कृष्ण म्हणाला- ‘‘राजा, मला जर पकडण्याचा बेत असेल तर तू आड येऊ नकाे. तुझ्या पुत्रांना वाटेल ते करू दे. मग पाहू दे तमाशा. पाहूया ते मला आवळतात की मी त्यांना आवळताे!’’ लगेच धृतराष्ट्र दुर्याेधनाला म्हणाला- ‘‘दुष्टा, असले हलकट कृत्य तू करणार आहेस! असले कर्म तुझ्यासारख्या शतमूर्खालाच शाेभते पण लक्षात ठेव.
 
मुठीत वायू धरून ठेवणे किंवा सर्व भूगाेलाचा भार मस्तकावर उचलणे जसे अश्नय आहे तसे या अज्निंय पुंडरीकाक्ष केशवाला जबरीने पकडणे अश्नय आहे.’’ दुर्याेधनाचा ताे मूर्खपणाचा बेत सिद्धिस गेला नाही, आणि मग सात्यकी व कृतवर्मा यांचे हातात हात घालून कृष्ण सभेतून बाहेर पडला व रथात बसून कुंती आतेला भेटण्यासाठी निघून गेला.कुंतीचा निराेप घेऊन काैरवांच्याकडील इतर पुढारी मंडळीना फाटा देऊन कृष्णाने कर्णाला तेवढे आपल्या रथात घेतले व ताे चालू लागला.हस्तिनापुराच्या शिवेबाहेर आल्यावर कृष्ण कर्णाला म्हणालाकर्णा, तू कुंतीचा कानीन पुत्र आहेस. तू पांडवांच्या बाजूला ये. तू त्यांचा ज्येष्ठ भ्राता आहेस.
 
ज्येष्ठ पांडव म्हणून तुलाच राज्याभिषेक करवताे. सारे यादवसुद्धा तुझी सेवा करतील आणि तुझे वैभव पाहून माता कुंती आनंदित हाेईल.’’ कर्ण म्हणाला- ‘‘कृष्णा! तुझ्यावर माझा विश्वास आहे. तुझे सांगणे प्रेमाचे, स्नेहाचे कळवळ्याचे व माझ्या कल्याणाचे आहे. यात तुझे काही कपट नाही; पण कृष्णा! इतके दिवस हाेऊन गेले मी दुर्याेधनाचे आश्रयावर राजविलास भाेगत आहे. माझ्याच आधारावर दुर्याेधन युद्ध करू पहात आहे. मला याच्याशी बेईमान हाेता येणार नाही.कृष्णा! तू माझे ऐक. मला तू गुप्त गाेष्ट सांगितलीस, पण ही गाेष्ट कृपाकरून पांडवांना सांगू नकाेस. कारण तसे झाले तर ताे धर्मात्मा युधिष्ठिर मी कुंतीचा पहिला पुत्र म्हणून सारे राज्य मला अर्पण करील. असे हाेणे याेग्य नव्हे.कृष्णा! प्रजेचे कल्याण व्हावे म्हणून धर्मात्मा युधिष्ठिर यानेच राज्यावर बसावे हेच चांगले आहे.
 
कृष्णा! आता युद्ध हाेणार हे ठरलेलेच आहे जीवनाच्या संध्याकाळी माझी एवढीच इच्छा आहे की मला रणांगणावर मृत्यू येऊ दे.
कृष्णा! मला दिसते आहे की आता सुरू हाेणारा यज्ञात दुर्याेधन मारला जाऊन समाप्त हाेईल व काैरवांच्या बायका गांधारीसह वर्तमान रणांगणावर ढसढसा रडून आपले देह अश्रूंनी भिजवतील तेव्हा या यज्ञातील अवभृत स्नान हाेईल.कृष्णा! शम व्हावा, युद्ध टळावे म्हणून तू कितीही जिवापाड खटपट केलीस! कृष्णा! तू केवढा माेठा आहेस. कृष्णा तू किती मायाळू, ममताळू, कृपाळू, कनवाळू आहेस! सख्या! तुला एकदा मला कडकडून भेटू दे. स्वर्गात तुझी भेट हाेईल पण या महीतलावर भावानं, भ्नतीनं, भावनेनं मला एकदा तुला भेटू दे.’’ असे म्हणून कर्ण कृष्णाला कडकडून भेटला.
Powered By Sangraha 9.0