वाच्यार्थ : ज्या माता- पित्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण दिले नाही, ते आपल्या मुलाचे वैरीच हाेत; कारण ज्याप्रमाणे हंसाच्या समूहात बगळा शाेभत नाही, त्याचप्रमाणे विद्वानांच्या सभेत असा अज्ञानी मुलगा शाेभत नाही.
भावार्थ : चाण्नयांनी हंस आणि बगळा यांची तुलना करून ज्ञानी आणि अज्ञानी (अडाणी) यातील फरक दाखविला आहे.
1 हंस : राजहंस हा पक्षी माेहक पांढराशुभ्र, कमनीय असा असताे. आकाशात उडताना, पाण्यात पाेहताना त्याच्या हालचाली फार डाैलदार, आकर्षक असतात. पाेहताना तर ताे इत्नया काैशल्याने पुढे जाताे की, पाण्यात फ्नत वलय उठतात; पण त्यांची हालचाल इतकी सहज असते की, ताे जणू तरंगत जाताेय असे वाटावे. हंस हे सर्वाेत्कृष्टतेचे प्रतीक मानले जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे, ‘राजहंसाचे चालणे जगी जाहलेसे शहाणे...’