इंद्रियासाठी धन जे देऊ शकते त्याचे आश्वासन हेच आसक्तिचे कारण आहे.धन इंद्रियांना जे देऊ शकते त्याचे आश्वासन हेच कर्माचे आकर्षण आहे. समजा उद्या असे कळले, की धन आता काही एक खरीदू शकत नाही, तर मग धनातले सगळे आकर्षण खलास हाेऊन जाईल. मग दुकानात बसून गिऱ्हाईकाकडून दाेन पैसे जास्त घेण्यात उत्सुकता नव्हती. दाेन पैशांचे काय मूल्य? इंद्रियाची तृप्ती हे मूल्य आहे. धनाचे जे मूल्य आहे, जे याेग्य मूल्य आहे ते इकाॅनाॅमिक-अर्थशास्त्रीय नाही. धनाचे खाेलवरचे माेल मानसिक आहे. राजधानीमध्ये बसून अर्थशास्त्रज्ञ धनाचे वास्तविक मूल्य ठरवत नसतात. धनाचे वास्तविक मूल्य ठरविले जाते ते मनाच्या वासनांकडून, इंद्रिये ठरवतात, ते मूल्य! म्हणून महावीरांसारखा एखादा माणूस जेव्हा साेबत पैसा ठेवत नसताे, तेव्हा त्याचे खाेलवरचे कारण धनाचा त्याग हे नसते, तर त्याचे कारण असते, इंद्रियाच्या तृप्तीच्या आयाेजनाची जी इच्छा असते, तिचे विसर्जन हेच.
मग धन बाळगण्याचे काहीच कारण नसते. मग धन केवळ ओझे हाेऊन जाते आणि ते ओझे वाहण्याचा मूर्खपणा महावीर करणार नाहीत.धनासाठी माणूस किती व्याकुळ हाेऊन श्रम करताे, आटापिटा, खटपट करताे, धडपड- धावपळ करताे! का? तर भरवसा आहे, विश्वास आहे धनावर म्हणून. सर्व गाेष्टी धनाने विकत घेता येतात. जेवण-खाण असाे, वस्त्र असाे, कामपूर्ती असाे, घर असाे. धनाने काहीही विकत घेता येते.धन साेयी खरीदू शकते. ‘धनाने खरीदू शकताे’ हेच त्याचे मूल्य आहे. धन सर्व काही खरीदू शकते. फक्त सुख साेडून, बाकी सर्व धन खरीदू शकते. पण जर आपणाला असे कळले की धन सुखे खरीदू शकत नाही, तर धनासाठीची धावपळ एकदम बंद पडेल.