गीतेच्या गाभाऱ्यात

15 Oct 2022 15:54:32
 
 
पत्र पंचविसावे
 
 

Bhagvatgita 
 
 
महाभारतात म्हटले आहे की त्यावेळी तेथे कृष्ण असता तर द्यूतातील पेचप्रसंग सुटला असता.तू असे लक्षात घे कीकृष्णाचे जीवन म्हणजे जीवनातील पेचप्रसंगातून कसे सुटावे याचे शिक्षण, व कृष्णाच्या जीवनाचे तत्त्वज्ञान म्हणजे गीतेचे तत्त्वज्ञान.महात्मा गांधी सार्थत्वाने गीतेबद्दल एका वा्नयांत सांगतात की- ‘गीता म्हणजे मानवी जीवनातील पेचप्रसंगाचा काेष असून माझ्या जीवनातील सारे पेचप्रसंग गीतेने साेडवले आहेत.’ दुर्याेधनाचे भाषण ऐकून कृष्ण म्हणाला- ‘‘दुर्याेधना तू प्रथम आलास असे म्हणताेस त्यावर माझा विश्वास आहे, पण प्रथम मी ज्याला पाहिले ताे अर्जुन.
 
तू प्रथम आलास म्हणून व मी प्रथम अर्जुनाला पाहिले म्हणून दाेघांनाही साह्य करणेस मी बांधलेला आहे. प्रवारणं तु बालानां पूर्व कार्यम् (लहानांची इच्छा प्रथम पुरवावी) असा धर्माचा नियम आहे. म्हणून मला प्रथम अर्जुनाची इच्छा पूर्ण केली पाहिजे. माझे साह्य दाेन प्रकारचे आहे.एकामध्ये माझे सैन्य व दुसऱ्यामध्ये युद्धात हातात शस्त्र न धरणारा असा मी. यापैकी एक वाटा एकाला मिळेल व दुसरा वाटा दुसऱ्याला मिळेल अर्जुन लहान आहे. त्याने आपला वाटा प्रथम मागून घ्यावा.’’ अर्जुनाने युद्धात हातात शस्त्र न धरणारा कृष्ण पसंत केला, व दुर्याेधनाने सैन्य घेतले.पेचप्रसंगातून कृष्णाने जी ही ताेड काढली त्यामुळे अर्जुन व दुर्याेधन दाेघेही खुश झाले.
 
*** पांडवांचा मामा- माद्रीचा भाऊ- शल्य फार माेठे सैन्य घेऊन पांडवांना साह्य करावे म्हणून पांडवांच्याकडे येण्यास निघाला.तू असे लक्षात घे की पांडवांच्यापेक्षा दुर्याेधन बुद्धिमत्तेत फार वरचढ आहे. त्याने शल्य येत असताना वाटेत जागाेजागी त्याची खूप बडदास्त ठेवली. दुर्याेधनाच्या नाेकरांनी त्याला जागाेजागी इतके खुश केले की शल्याला वाटलेह्या लाेकांनी मला इंद्रापेक्षाही माेठा मान दिला आहे.शल्याला वाटते हाेते की- हे सारे पांडवांच्या आज्ञेवरून चालले आहे.
 
एकदा शल्य फार खुश झाला व त्याने वर द्यायची इच्छा प्रदर्शित केली.दुर्याेधन लपून छपून हाेता. त्याच्या नाेकरांनी त्याला शल्याची इच्छा सांगितली- लगेच दुर्याेधन शल्यापुढे आला व म्हणाला- ‘मामा मी आपल्या भेटीला आलाे आहे.’ मद्रराज शल्याला मग कळले की-ही सारी बडदास्त पांडवांनी केलेली नसून दुर्याेधनाने केली आहे.शल्यापुढे पेचप्रसंग हाेता, पण ताे त्यातून सुटू शकला नाही. त्याला धर्म माहीत हाेता, पण कृष्णाप्रमाणे त्याला धर्माचा बारकावा कळत नव्हता. दुर्याेधनाला युद्धात साह्य करण्याकरता त्याच्यापुढे गेल
Powered By Sangraha 9.0