प्राेकाॅस्टिनेशनचा आराेग्य व करिअरवर परिणाम अजून बराच वेळ आहे, नंतर करू की काम, हाेईल रे बाबा, काळजी करू नकाे, अशा प्रकारच्या काम टाळण्याच्या प्रवृत्तीला शास्त्रज्ञांनी ‘प्राेकाॅस्टिनेशन’ म्हटले आहे. अशा स्थितीत या लाेकांची सर्व कामे ‘पेंडिंग माेड’वर चालतात.माणसामध्ये काम टाळण्याची प्रवृत्ती जन्मजात नसते. तर, भावना व्य्नत करता न येण्याच्या भीतीमुळे ही प्रवृत्ती निर्माण हाेते.संधिसाधूपणा, वैताग, चिंता, उदासीनतेमुळे सुद्धा बरेच लाेक प्राेकाॅस्टिनेट हाेतात. ही अशी वेळ असते ज्यावेळी लाेकांना कळतच नाही की, त्यांना काय करायचे आहे. इंग्लंडच्या डरहॅम विद्यापीठात झालेल्या एका अध्ययनाचा निष्कर्ष असा की, प्राेकाॅस्टिनेशनचा माणसाच्या आराेग्य व करिअरवर प्रतिकूल परिणाम हाेताे.
या विद्यापीठाचे प्राे. फुशिया सिराेईस यांनी 20 वर्षे अध्ययन केले असता असे आढळून आले की, तरुणांमध्ये प्राेकाॅस्टिनेशन एक सामान्य प्रक्रिया आहे.95% तरुण काेणत्या ना काेणत्या प्रकारे काम टाळण्याचा प्रयत्न करीत असतात.तर, 50% तरुण काहीही कारण नसताना विनाकारण काम वेळेवर करण्याचे टाळतात. याला क्राॅनिक प्राेकाॅस्टिनेशन म्हणतात.दुसऱ्या बाजूला ही प्रवृत्ती प्राैढांमध्ये 25% असते. पण प्राेकाॅस्टिनेशन करणारे लाेक स्वत:चेच नुकसान करून घेतात.क्राॅनिक प्राेकाॅस्टिनेशनमुळे एंग्जाइटी, इन्साेम्निया आणि ट्रेसची श्नयता वाढते.यामुळे पीडित व्य्नतीने हे समजून घेण्याची गरज आहे की, दिनचर्या बदलणे व स्वत:ला समजणे हाच यावर उपाय नाही, तर आपल्या भावना चांगल्या प्रकारे व्य्नत केल्यास जास्त फायदा हाेताे.