अन् सगळेच घाट खूप छाेटेसेच नाहीत का - गंगेच्या तुलनेने. गंगा खूप माेठी आहे.पूर्ण गंगेवर घाट बनविणेही ार अवघड आहे. पण सर्व धर्म हाच प्रयत्न करतात की - सगळ्या गंगेवर माझेच घाट असावेत असा. असे घाट हाेऊ शकत नाहीत, हा भाग निराळा. इकडे घाट बनताेय, ताेवर तिकडे गंगेचे पात्रच बदलून जाते. गंगा विशाल आहे. अस्तित्वाची गंगा विराट आहे. आपण एखाद्या काेपऱ्यात घाट बनवू शकलाे तरी खूप झाले असेच समजा. याने आपल्याला सूर मारता आला तरी पुष्कळ झाले. मूलत: तीन वेगवेगळ्या प्रकारचे घाट आहेत - भावप्रधानांसाठी, विचारप्रधानांसाठी अन् वासनाप्रधानांसाठी. कृष्णाने हे जे सूत्र सांगितले आहे, ते वासनाप्रधानांसाठी, समत्वाच्या घाटाने ताे याेगारूढ हाेऊ शकताे.
ज्याची आसक्ती इंद्रियातही नसते अन् कम ार्तही नसते, जेव्हा या दाेन्ही आसक्ती उरत नाहीत, तेव्हा त्या क्षणी पुरुषाला याेगारुढ असे म्हणतात.या दाेन गाेष्टी समजून घेणे उपयुक्त हाेईल. ज्याची इंद्रियामध्येही आसक्ती नाही. अन् कर्मामध्येही नाही-हे दाेन्ही संयुक्त आहेत. इंद्रियामध्ये आसक्ती असेल तरच कर्मामध्ये आसक्ती असते. इंद्रियांमध्ये आसक्ती नसेल तर कर्मामध्ये असक्ती असण्याचे काहीही कारण नाही. म्हणून कृष्ण जे सांगत आहे त्याच्यामागे माेठी वैज्ञानिक प्रक्रिया आहे. ताे आधी म्हणताे ज्याची इंद्रियात आसक्ती नसते...ज्याला इंद्रियात आसक्ती नसते त्याला कर्मात आसक्ती असूच शकत नाही. सर्व कर्मासक्ती हा इंद्रियासक्तीचाच ैलाव असते.जर आपण धन गाेळा करताहात तर त्यासाठी जे कर्म करावे लागते, त्यामध्ये माेठे आसक्त असावे लागते. ज्याला केवळ कर्म करण्याची आसक्ती आहे, असा माणूस सापडणे अवघड आहे