पहिल्या सुपरसाॅनिक कमर्शिअल कार्गाे विमानाचे पहिले उड्डाण सन 2030 मध्ये हाेणार आहे. हे सुपरसाॅनिक विमान काेल्ड फ्युजन न्यू्निलयर रिअॅ्नटर सिस्टीमद्वारे संचालित हाेणार आहे.एका स्पॅनिश एअरक्राफ्ट डिझायनर कंपनी ऑस्कर व्हिनॅलेजने सुपरसाॅनिक कमर्शियल विमानाचे डिझाइन तयार केले आहे. या विमानाचा वेग त्याच्या आवाजापेक्षा तिप्पट जास्त असेल. हे विमान लंडन ते न्यूयाॅर्क हे अंतर 80 मिनिटांत पार करेल. या विमानात अण्विक इंधनाचा वापर केला जाईल. या विमानामुळे हवाई वाहतूक काही पटीने गतिमान हाेणे अपेक्षित आहे.मानवासाठी 17 डिसेंबर 1903 हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी माणसाने प्रथमच आकाशात उड्डाण केले. राईट बंधूंनी जगात सर्वप्रथम बनविलेले हे विमान हाेते.
त्यावेळी या विमानाचा वेग ताशी फ्नत 10.98 कि.मी. हाेता. हे विमान फ्नत 120 फूट उंचीवर उड्डाण करू शकत हाेते; परंतु 2003 मध्ये जगातील सर्वांत पहिले सुपरसाॅनिक काॅन्काेर्ड प्रवासी विमान, त्यानंतर 1958 मध्ये सुपरसाॅनिक लढाऊ विमान आणि आता सन 2030 मध्ये कमर्शिअल (कार्गाे) सुपरसाॅनिक पहिले विमान उड्डाण करणार आहे.वास्तविक पाहता कमर्शिअल कार्गाे विमाने दुसऱ्या महायुद्धानंतर खऱ्या अर्थाने विकसित झाली व यानंतर अनेक एअरलाइन्स कंपन्या अस्तित्वात आल्या.मिलिटरी कार्गाे विमाने व लढाऊ विमाने खरेदी करून अनेक उद्याेगपतींनी नागरी वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला.