मी नाही असा माणूस सापडणे कठीण आहे. विशेष म्हणजे मी म्हणजे नेमके काय? याचे ज्ञान नसतानाही प्रत्येकाकडे मी हा असताेच. मी फलाणा आहे, बिस्ताणा आहे, मी असा आहे, मी तसा आहे,असे प्रत्येकजण म्हणताे. मी म्हणजे काय, हे कळत नसतानाही मी म्हणजे वेडसरपणाचे वाटते. पण प्रत्येक माणूस या वेडसरपणालाच शहाणपणा समजताे. एखाद्याने मीचे अस्तित्व झुगारले तर लाेक त्याला वेड्यात काढतात.याला स्वत:चे काहीच कसे वाटत नाही, याला काही मान अपमान, आपला-परका काही आहे की नाही असे लाेक म्हणतात. कारण माणसाने मीची
परिभाषाच अशी केली आहे की, ज्यात स्वार्थ, अहंकार, ईर्षा, द्वेष, मत्सर, काम, क्राेध, अभिमान आदीचा समावेश आहे.त्यामुळे या सर्वांना साेडणारा माणूस समाजाला वेडा वाटू लागताे. मुळात मी म्हणजे कांहीच नसल्याने त्याला नांव, गांव आप-पर आदि कांहीच नसते. मी मानायचाच ठरला तर ताे आत्मस्वरूप असताे.त्याच्या ठिकाणी फक्त ताे म्हणजे ताेच असताे.त्याला ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, आदीशी कांही देणे-घेणे नसते. या अनुषंगाने बाेलताना तुकाराम महाराज म्हणतात, कांहीच मी नव्हे काेणिये गांवीचा । एकटा ठायींचा ठायीं एक्।।जय जय राम कृष्ण हरी ज्ञानदास.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448