भाव ार पारदर्शी असतात - काचेसारखे! वासना अपारदर्शक असतातदगडासारख्या! त्यातून काहीही दिसत नाही. वृत्ती ार भरलेल्या असतात, तर भाव ार तरल असतात. अगदी झिरझिरीत वस्त्रासारखे, त्याच्या आरपार दिसू शकते. वृत्तींच्या मधाेमध उभे रहाल तरच द्वार मिळेल, ते दाेन दगड आहेत.पण भावाप्रती आपण सजग झालात, तर त्यातून आपल्याला आरपार दिसू शकेल. विचारांबद्दल सजगता, भावांप्रती स्मृती, वासनांप्रती समत्व.या तिन्हींचा परिणाम एकच हाेईल, तीन प्रकारचे लाेक पृथ्वीवर आहेत, म्हणून हे भेद आहेत.परिणाम मात्र एकच असेल.निर्विचार व्हा, वा निर्भाव व्हा, वा नि:संकल्प व्हा. मग जे उरेल, ते निराकार असेल.
आपण एकाच गंगेत सूर माराल, पण वेगवेगळ्या घाटांवरून.
घाट आपला असेल, वेगवेगळाजाेवर आपण घाटावर उभे आहात, ताेवर फरक असेल, पण गंगेत उडी मारली की मग काहीच फरक असणार नाही. मग असे म्हणता येईल का की मी या घाटावरून उडी मारली, माझी गंगा वेगळी, तुम्ही त्या घाटावरून उडी मारली, म्हणून तुमची गंगा वेगळी, उडी मारताक्षणीच घाट सुटून गेला. पण घाटाघाटांचे फरक जरूर आहेत. जर आपण बराेबर समजलात तर जगातील सगळे धर्म म्हणजे फक्त घाटांचा फरक आहे. ज्यांनी ज्ञान दिले त्या आपल्या उपदेशकांसाठी जैन लाेक जाे शब्दवापरतात ताे ार समर्पक वाटताे. ते त्याला तीर्थंकर असे म्हणतात.तीर्थंकर म्हणजे घाट बनवणारा. तीर्थ घडवणारा.त्याचा अर्थ एवढाच की, या माणसाने आणखी एक घाट बनवला-येथून लाेक उड्या मारू शकतात. तीर्थंकराने दावा गंगेचा केलेला नाही, फक्त घाटाचा केलेला आहे. या माणसाने गंगा बनवली असा दावा केलेला नाही. फक्त एवढाच दावा आहे की, या माणसाने एक नवा घाट बांधला, जेथून नाव साेडता येईल.