‘दगडूशेठ’च्या संस्कार वर्गातील मुलींचा महाभाेंडला

    12-Oct-2022
Total Views |
 
 

Dagdusheth 
 
ट्रस्टच्या उपक्रमात तीनशेहून अधिक मुली, महिलांचा पारंपरिक वेशात सहभाग संस्कारक्षम पिढी घडवण्यासाेबतच भारतीय संस्कृती आणि सणउत्सवांचे ज्ञान आजच्या पिढीपर्यंत पाेहाेचवण्यासाठी कार्यरत असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या संस्कार वर्गाचा महाभाेंडला माेठ्या उत्साहात पार पडला. संस्कार वर्गासह जय गणेश पालकत्व याेजनेतील 300 विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांनी पारंपरिक वेशात या भाेंडल्यात भाग घेतला.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नू.म.वि. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात महाभाेंडल्याचे आयाेजन करण्यात आले हाेते.
 
यावेळी ट्रस्टच्या संस्कार वर्गातील सर्व प्रशिक्षक उपस्थित हाेते. जय गणेश पालकत्त्व याेजनेत मुलांना मार्गदर्शन करणारे संस्कार वर्ग प्रमुख विजय भालेराव, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यांच्यासह पालक उपस्थित हाेते.ट्रस्टतर्फे चालवल्या जाणाऱ्या संस्कार वर्गात दुसरी ते महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. तेही कार्यक्रमाला उपस्थित हाेते.महाभाेंडल्यासाेबतच जय गणेश विद्यार्थी पालकत्व याेजनेतील मुलांसाठी विविध उपक्रम राबवले गेले. कार्यक्रमानंतर भाेंडल्याची खिरापत उपस्थितांना देण्यात आली. तसेच, भाेंडल्यासारख्या सणांचे महत्त्वही सांगण्यात आल