पढतमूर्खांचे नमुने आपण आपल्या अवतीभाेवती राेज पहात असताे. एखादा हुशार डाॅ्नटर वास्तुशास्त्राच्या नादी लागून बंगल्याची ताेडफाेड करताे, तर एखादा प्रतिभावंत लेखक मानसन्मानासाठी सत्ताधाऱ्यांचे काैतुक करताे.कधी उत्तम प्रवचनकार मानधनासाठी अडून बसताे, तर कधी धर्मप्रसार करणारे आचार्य हा मंत्री, ताे श्रीमंत तर हा सामान्य भक्त असे भेदाभेद पाळताना दिसतात.म्हणजे विद्या शिकूनही अज्ञानी राहिलेले, परमार्थ वाचून सांगणारे पण आचरणात न आणणारे असे पढतमूर्ख तेव्हाही हाेते, आजही आहेत आणि पुढेही राहणारच आहेत. म्हणूनच श्रीसमर्थांचा उपदेश हा तेव्हा, आज आणि उद्या अगदी बाविसाव्या नव्हे तर शंभराव्या शतकातही उपयाेगी पडणारा असा कालातीत आहे.
पढतमूर्खाची लक्षणे सांगताना ते पुढे म्हणतात की, ताे कधी मानसन्मानाच्या अपेक्षेने लाेकांचा अनुनय करताे, तर कधी अयाेग्य व्यक्तीचीही स्तुती करताे, तर कधी आदरणीय व्यक्तीचीही निंदा करावयास तयार असताे. थाेड्नयात वेळप्रसंग आणि आपला स्वार्थ पाहून त्याचे वागणे असते, त्यात सत्याचा लवलेश नसताे. ताे समाेर चांगले बाेलला तर पाठीमागे निंदा करेल आणि बाेलणे एक आणि कृती वेगळीच, असे त्याचे वर्तन असते. समाेर जाणकार श्राेते असले तरी आपण वक्ता आहाेत म्हणून त्यांचा अनादर करण्यासही ताे मागेपुढे पाहात नाही आणि जे सत्य सांगावयाला हवे ते साेडून समाेरच्याला बरे वाटावे म्हणून असत्यही बाेलताे.