ओशाे - गीता-दर्शन

11 Oct 2022 12:25:51
 
 
 

Osho 
कधी काव्याच्या पुस्तकातून गीत वाचू, मधूनच सुरेचे घाेट घेऊ आणि मग ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली प्रियेच्या आलिंगनात विरघळून झाेपी जाऊ. एक घनदाट वृक्ष पुरेसा आहे. कुठल्या माेठ्या महालाची काही एक आकांक्षा नाही. आता उमर खैय्याम ज्या प्रकारच्या माणसाचे वर्णय करताेय ताे भावनाप्रधान आहे. जीवनात प्रेम असले, गीत असले, सावलीला झाड असले की बस्स. मग बाकी काही नकाे. त्याच्या चित्तात विचारांची ारशी वर्दळ नाही. सुरापान करावे किंवा नाही हा विचारही त्याला सतावणार नाही. झाडाखाली कुठे प्रेम हाेऊ शकते का, महालाशिवाय कसे हाेईल? - असेही त्याला वाटणार नाही. नाही.. प्रेम आहेना, मग वृक्षच महाल झाला आणि अशा माणसाला जर प्रेम मिळाले नाही तर, महालसुद्धा वैराणच वाटेल. हा माणूस भावपातळीवर जगत आहे. ‘एखादा काव्यसंग्रह जवळ असला तरी खूप झाले,’ असे उमर खैय्याम म्हणताे.
 
एखादे गीत अधून-मधून गुणगुणायला मिळाले म्हणजे बस्स झाले.अशा माणसासाठी बुद्धांनी जे सूत्र सांगितले आहे ते म्हणजे - सम्यकस्मृति, राईट माइंडुलनेस. या गाेष्टीची जागरूकता, की हा क्राेध आहे, हे प्रेम आहे. हा तिरस्कार आहे. हे जे काय मी करत आहे त्याच्याबद्दल सतत एकाग्रतेने जागरूकता.त्याची पूर्ण स्मृती. जाे काेणी आपल्या भावांप्रती अशी जागरूकता ठेवू शकेल, एकाग्र स्मृतीला प्राप्त हाेऊ शकेल आणि समजू शकेल की हे प्रेम आहे, तर ताे चकित हाेऊन जाईल. कारण, प्रेमासाेबतच तिरस्कार असल्याचे त्याला दिसून येईल. त्याचे प्रेम पारदर्शक हाेऊन जाईल, त्यातून त्याला पलीकडील घृणाही दिसून येईल. तसेच त्याला क्राेधापाठाेपाठ असलेला पश्चात्ताप आणि क्षमाही दिसून येईल.सगळे भाव पारदर्शी हाेऊन जातील.
Powered By Sangraha 9.0