स्वदेशी फर्निचरला वाढती मागणी

    05-Jan-2022
Total Views |
 
 
पारंपरिक हस्तकलेला तंत्रज्ञानाची जाेड
 
 
furniture
 
परदेशांतून आयात केलेल्या फर्निचरपेक्षा स्वदेशी फर्निचरला ग्राहकांची मागणी वाढली आहे. गृहसजावाटीच्या व्यवसायातील ब्रँडही स्थानिक कारागिरांना उत्तेजन देत आहेत.महामारी सुरू झाल्यापासून ग्राहकांच्या पसंतीमध्ये बदल झाले असून, त्यात फर्निचरचाही समावेश झाल्याचे दिसते.परदेशांतून आलेले फर्निचर घेण्यापेक्षा स्वदेशातील कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना मागणी वाढायला लागली आहे.ग्राहकांचा हा बदलता कल लक्षात घेऊन उत्पादकांनीही स्थानिक कारागिरांना प्राेत्साहन देणे सुरू केले आहे.फर्निचरच्या सजावटीसाठी कापडाचा वापर हाेताे आणि त्या क्षेत्रातील अनेक परदेशी कंपन्या भारतात जम बसविण्याच्या प्रयत्नांत आहेत. भारतीयांची पसंती त्यांच्याही लक्षात आली आहे.
 
‘मॅनग्राेव्ह कले्निटव्ह’च्या व्यवसाय विभागाच्या प्रमुख सुमन शर्मा म्हणाल्या, ‘फर्निचर तयार करताना त्या वस्तूचे साैंदर्य आणि आरामदायीपणाचा विचार केला जाताे. ते विकत घेणाऱ्या ग्राहकाचे त्या वस्तूबराेबर भावनिक नाते असल्याचे आम्ही मानत असल्यामुळे हस्तकला आणि तंत्रज्ञान यांचा संगम साधण्याचा आमचा प्रयत्न असताे.‘भारतात प्रथमपासूनच हस्तकाैशल्याच्या वस्तू तयार हाेत असल्या तरी त्याला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जाेड मिळाल्याने या वस्तू विविध आकारांत अधिक आकर्षक पद्धतीने तयार केल्या जातात. स्थानिक ब्रँड्स हे काम करतात आणि अशा वस्तूंचे आयुष्यही जास्त असते.