अमरावतीत जगातील सर्वांत लांब स्कायवाॅक हाेणार

28 Jan 2022 14:40:52
 
 

sky 
 
भगवान श्रीकृष्णाची अर्धांगिनी रु्निमणीचे माहेरघर असलेले काैंडिण्यपूर म्हणजे आजचे अमरावती. या अमरावती शहरात जगात माेठा स्कायवाॅक साकारणार आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. हा स्कायवाॅक चिखलदरा ते अमरावती असा 407 मीटर लांब असेल.सध्या जगात सर्वांत लांब स्कायवाॅक स्वित्झर्लंड आणि चीनमध्ये आहे. स्वित्झर्लंडमधील स्कायवाॅक 397 मीटर, तर चीनचा स्कायवाॅक 360 मीटर लांब आहे, तर भारताचा चिखलदरा - अमरावती हा स्कायवाॅक 407 मीटरचा जगातील सर्वांत लांब स्कायवाॅक असणार आहे.
 
या स्कायवाॅकला प्रथम राज्याची व आता केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच या स्कायवाॅकचे काम सुरू हाेणार आहे. हा निर्णय राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशाेमती ठाकूर यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत देशाची शान वाढविणाऱ्या या स्कायवाॅकचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कार्यालय याबाबतीत केंद्राकडे पाठपुरावा करीत असल्याचे यशाेमती ठाकूर यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0