आंध्र विद्यापीठ परिसरात सापडली एक मृत गाय

01 Sep 2021 14:37:15
 
 
गाेआधारित शेतीवर गेली दहा वर्षे अनेक ठिकाणी प्रयाेग केलेल्या आंध्र प्रदेशमध्ये तेथील विद्यापीठ परिसरात ठार मारल्या गेलेल्या एका गाईचा विषय हा तेथील राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय झाला. (भाग : 1490)
 
 

cow_1  H x W: 0 
 
यापुढे गाय हा केवळ दुधाचे उत्पादन देणारा प्राणी नाही, तर दहा बारा किलाे शेण आणि दहा बारा लिटर गाेमूत्र यांच्या आधारे एक एकर शेती करणाऱ्यांचे प्रमाण आंध्र प्रदेशात माेठ्या प्रमाणावर आहे.त्यामुळे विद्यापीठ परिसरात एका गाईचा संशयास्पद मृत्यू हाेणे, या घटनेवर सर्वांचे कान टवकारले गेले आहेत. तेथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यावर चाैकशीची मागणी केली. त्यांनी स्थानिक पाेलिस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली.त्यावर त्या विद्यापीठाचे कुलगुरू प्रसाद रेड्डी यांनी पाच सदस्यीय समिती जाहीर केली आहे. त्याचे निमंत्रक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लाॅ काॅलेजचे प्राचार्य श्रीपाद सुमित्र आहेत. याबाबत भारतीय जनता पक्षाचे पी.
व्ही. एन. माधव यांनी प्रसार माध्यमांशी बाेलताना सांगितले की, आंध्र विद्यापीठाच्या हद्दीत एक गाय जखमी हाेऊन मृत स्थितीत मिळावी, ही दुर्दैवी बाब आहे.पाच-सहा वर्षांपर्यंत गाईला फक्त गाेमाता म्हणून महत्त्व हाेते, पण गाेवंश आता देशाच्या आर्थिक स्थितीचा आधार बनत आहे. त्यामुळे एका गाईची विद्यापीठाच्या परिसरात हत्या हाेणे ही लाेकांच्या जिव्हारी लागणारी बाब आहे.
 
भाजपाबराेबर तेथील जनसेना पार्टी हा पक्षदेखील या विषयासाठी आग्रही आहे.भाजपाचे माधव यांच्या म्हणण्यानुसार, विद्यापीठात गाईला जखमी करून हत्या करणे आणि लाेकांच्या लक्षात येताच ताे मृतदेह पुरून टाकणे याचे दाेन महत्त्वाचे पैलू आहेत. त्याचप्रमाणे गाईच्या मालकाला एक हजार रुपयांचा दंड करणे हीसुद्धा आक्षेपार्ह बाब आहे. एक म्हणजे अशी घटना घडल्यावर शासकीय यंत्रणेला कळविणे आवश्यक हाेते आणि यातील दुसरी समस्या अशी आहे की, विद्यापीठाच्या आजूबाजूच्या उपनगरात शिवाजी पालेम, मद्दिलापालेम, रेसुपुवनीपालेम या भागात दाट लाेकवस्ती आहे. त्यामुळे साहजिकच विद्यापीठ परिसरात थाेडी हिरवळ असल्याने तेथे गाई येतात.विद्यापीठाचा त्याला आक्षेप असेल, तर त्यांनी त्यांना आत येऊ देऊ नये, पण आता आल्यावर तिला जखमी करणे व त्यातच गाईचा मृत्यू हाेणे ही बाब संतापजनक आहे. शहरी भागातील अगदी माेकाट हिंडणाऱ्या गाईच्या शेणाच्या आणि गाेमूत्राच्या आधारे पंचवीस पंचवीस एकर बागाईत जमीन अधिक सुपीक हाेते, हे स्पष्ट झाल्यावर प्रत्येक गाईकडे बघण्याचा दृष्टिकाेन बदलणे आवश्यक आह
Powered By Sangraha 9.0