ईशान्य भारतातील गाेतस्करीत विदेशी ताकदींचा सहभाग

30 Aug 2021 14:54:27
 
 
आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये हे बेकायदा गाेवंश निर्यातीचे प्रकार राेखण्यासाठी तेथील गाेसेवा संघटनांनी गेली काही वर्षे चिवट प्रयत्न सुरू केले हाेते. अनेक वर्षे बांगला देशला दरवर्षी पंचवीस ते तीस लाख गाेवंशाची बेकायदा निर्यात हाेत असे. त्यात ईशान्येकडील राज्यांचाही माेठा सहभाग असे.
(भाग : 1488)
 

cow_1  H x W: 0 
 
सध्या बांगला देश आणि पश्चिम बंगाल यांच्या सीमेवर म्हणजे ब्रह्मपुत्रा आणि गंगा या नद्यांचे समुद्राला मिळणारे जे हजाराे प्रवाह आहेत, त्यातून तेथे सीमा सुरक्षा दलाचा पहारा आहे; पण ते हजाराे प्रवाह आणि सुंदरबनाचे घनदाट जंगल यातून ती चाेरटी निर्यात राेखणेही कठीण असते. गेल्या पाच वर्षात पश्चिम बंगालला जाणाऱ्या चाेरट्या गाेवंश वाहतुकीवर नियंत्रण बसले हाेते. आता ईशान्येकडील राज्यातून हाेणारी गाेवंशाची चाेरट्या वाहतुकीची व्याप्ती समजू लागली आहे. ती पश्चिम बंगालइतकीच माेठी आहे.
वास्तविक गेल्या पाच वर्षात मिझाेराममधील परिस्थितीफुटरता राेखण्याच्या संदर्भात बरीच सुधारली आहे.
 
पण, त्यापूर्वी तेथे जवळ जवळ पन्नास वर्षेफुटीरतेची चळवळ हाेती. तेथील ख्रिश्चन वर्चस्व लक्षात घेऊन इ.सन 1986 मध्ये काँग्रेसने म्हणजे राजीव गांधी पंतप्रधान असताना ‘ख्रिश्चन जाहीरनामा’ काढला हाेता. त्यातील आश्चर्याची बाब म्हणजे दीर्घकाळफुटीरतेला पाठिंबा दिलेला लाल डेंगा याने काँग्रेसच्या ख्रिश्चन जाहीरनाम्यावरून काँग्रेसलाच ‘फुटीर’ ठरवले हाेते. सध्याची गाईंची चाेरटी आयात निर्यात, मादक पदार्थांच्या तस्करीला संरक्षण आणि ब्रह्मदेशी राेहिंग्यांना देशात घुसण्यास संरक्षण देणे, याबाबी राष्ट्रीय महत्त्वाच्या ठरल्या आहेत. आजपर्यंत गाेहत्याबंदी हा विषय फक्त सांस्कृतिक भावनेपुरताच मानला जायचा.
 
पण, आता गाईच्या दहा किलाे शेणात एक एकर शेती हाेते, हा विषय माेठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात दिसू लागल्याने देशाची शेतीची आर्थिक घडी त्यामुळे सुधारेल, असे जाणकारांना वाटू लागले आहे. कॅन्सर, किडनीविकार, हृदयविकार यावर ग्रामीण भागात गाेवैद्यकाच्या आधारे अतिशय कमी खर्चात हाेऊ लागले आहेत.आसाम आणि पश्चिम बंगालमधील गाेसेवा विभागाने गेल्या दहा वर्षात दहा हजार गावात या विषयाला गती दिली आहे.त्यामुळे कालपरवापर्यंत याविषयाकडे फक्त धार्मिक श्रद्धा या दृष्टिकाेनातून बघितले जात हाेते, तेथे आता देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकाेनातून बघितले जाऊ लागले आहे.
Powered By Sangraha 9.0