गाजरगवत, रासायनिक खते सवयीची झाल्याने समस्या कमी हाेत नाहीत

14 Aug 2021 17:35:25
 
अर्थात जी बाब आपण साेपेपणाने आणि सहजपणाने वापरताे त्याला महायुद्धाची शस्त्रे आणि अस्त्रे कसे म्हणायचे, असे आपल्यालाही वााटणे साहजिक आहे. पण, एक गाेष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गेल्या शंभर वर्षांत रासायनिक खतांनी जगात महायुद्धापेक्षाही अधिक नुकसान केले आहे. (भाग : 1473)
 

weeds_1  H x W: 
 
भारतात आज रासायनिक खतांची सवय एवढी अंगवळणी पडली आहे की, ती न वापरणे हेच गावठीपणा किंवा विज्ञानाचा उपयाेग न करून घेण्यासारखे वाटते. याबाबत रासायनिक खतांच्या विराेधात जगभर माेहीम चालवणाऱ्या भारतीय विदुषी वंदना शिवा म्हणतात, या दुसऱ्या महायुद्धात माॅन्सेटाे कंपनीने दारूगाेळा पुरवला. युद्धकाळातच लाेकांचे नरसंहारसत्र सुरू झाले, ते कारखानेही (?) याच कंपनीने तयार केले.सध्याचे रासायनिक खतांचे तंत्रज्ञानही याच कंपनीचे आहे. याबाबत वंदना शिवा म्हणतात, ‘भारताकडे जी शेतीची वैदिक परंपरा आहे, त्यातून या साऱ्याला उत्तर आहे; पण ते जाणून घेण्यासाठी सवड काढण्याची गरज आहे.’ महायुद्धांच्या या साधनात गाजरगवत येते, हे आपल्या लक्षात येणार नाही इतके ते आपल्या ‘अतिपरिचयाचे’ झाले आहे.
 
सर्वसाधारणपणे जनावरे ही गाजर गवत खात नाहीत. पण, अलीकडे पावसाची अनियमितता ही वारंवार घडणारी बाब असल्याने कधी जनावरांचे खाद्य कमी हाेते किंवा पावसाळ्यात गाजरगवताचे हिरवे शेंडेही जनावरे खातात. त्या साऱ्याचा परिणाम असा हाेताे की, गाजर गवत खाल्लेल्या जनावरांच्या दुधाची चवच बदलते. पिताना ताे बदल लक्षात येताे; पण ते जर चहा किंवा काॅी यामध्ये वापरले असेल, तर ताे बदलही लक्षात येत नाही. गाजरगवत हे जात्याच विषारी असल्याने त्या जनावरांनी खाल्ल्यानंतरचे दूध किंवा जे गवत जेथे वाढते, त्याच्या आजूबाजूची जमीनही दूषित हाेते.या बाबी कदाचित चाणाक्ष शेतकऱ्यांच्या लक्षात येतीलही; पण ताे एवढीच काळजी घेईल की, जनावरांना गाजरगवतापासून दूर ठेवील. पण, त्यामुळे गाजरगवताची गेली साठ वर्षे जी देशभर किंवा जगभर पसरलेली समस्या आहे, ती तशीच राहील.
Powered By Sangraha 9.0