साप किंवा नाग असे म्हटले तरी आपल्या अंगावर काटा येताे आणि भीती वाटते! परंतु एक सापाची प्रजाती अशी आहे, की त्याच्या विषाचा वापर करून काही सेकंदात रक्तस्राव थांबवता येताे असे संशाेधनात आढळून आले आहे. हे विष चिकट पदार्थासारखे काम करते आणि जखम बांधून धरते ज्यामुळे रक्तस्राव हाेत नाही. हिरव्या रंगाच्या आणि लाल किनार असलेल्या लान्स हेड स्नेकपासून एक चिकट द्रव तयार केला जाताे, ताे एखाद्या जेलसारखा काम करताे. हा साप अमेरिकेत आढळताे. हा केलेला जेल जखमेवर लावायचा आणि त्यावर प्रकाश टाकला की ताे वाळताे आणि तत्काळ ब्लिडिंग थांबते. सायन्स अॅडव्हान्सेस या मासिकात याबाबत शाेधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. जे एन्झाईम ब्लिडिंग राेखते ते संशाेधकांना माहिती असून, त्याचा इतर गाेष्टींसाठी वापर याआधीच केला जाताे आहे.