...आणि ओसामा बिन लादेनला पकडले

18 Jun 2021 12:17:06
 
 

crocodile_1  H  
 
दहशतवादी ओसामा बिन लादेन याने एकेकाळी जगातील महासत्तांच्याही नाकीनऊ आणले हाेते. मात्र, एक दिवस त्याच्या कर्मानेच त्याला यमसदनी पाेहाेचवले.म्हणूनच आपण एखाद्या क्रूरकर्म्याला लादेन म्हणू शकताे.मग हा क्रूरकर्मा एखादी मगर का असेना. युगांडाच्या एका लहानशा गावातील नदीत असलेल्या एका मगरीला ओसामा बिन लादेन असे नाव देण्यात आले आहे. कारण या मगरीने आजवर किमान 80 लाेकांचा जीव घेतला आहे. लुगांगा या गावातील तळ्यामध्ये असणारी ही मगर 75 वर्षांची असून, तिची लांबी 16 फूट आहे. तिने 1991 ते 2005 या काळात किमान 80 जणांचा बळी घेतला आहे. ही संख्या म्हणजे या लहानशा गावातील एक दशमांश लाेकसंख्या आहे. ही मगर एका तळ्यात हाेती आणि मुले जेव्हा तळ्यातून पाणी काढायला जात तेव्हा मगर त्यांच्यावर हल्ला चढवत असे. तळ्यात येणाऱ्या बाेटींच्या खाली जाऊन ती बाेट पाण्यात उलटवत असे.
 
ही मगर मच्छीमारांच्या लाकडी नावांवर उडी घेत असे. एक दिवस पाॅल कीवाल्यवांगा याच्यावर मगरीने हल्ला चढवला. या हल्ल्यात पाॅलचा भाऊ वाचू शकला नाही. ‘ओसामा अचानक पाण्यातून उभी बाहेर आली आणि त्याने बाेटीवर उडी घेतली. मी बाेटीच्या मागच्या भागात बसलाे हाेताे. हा भाग पाण्यात बुडला. त्या वेळी पीटरने बाेटीचा एक काठ घट्ट धरून ठेवला हाेता. ताे माेठ्याने किंचाळत हाेता. ते दाेघेही सुमारे पाच मिनिटे एकमेकांशी लढत हाेते. अखेरीस मला फाटण्याचा आवाज ऐकू आला,’ अशी माहिती पाॅलने दिली. मगर पीटरच्या एका पायाला धरून काठाकडे ओढत नेऊ लागली. पाॅलने पीटरची मदत करण्याचा प्रयत्न केला. पण उशीर झाला हाेता.या क्रूर मगरीला पकडण्यात वन्यजीव कर्मचाऱ्यांना 2005 मध्ये यश आले. त्यासाठी 50 जणांच्या पथकाने प्रयत्न केले. या मगरीला ठार करण्याची सर्वांची इच्छा हाेती. पण वन्यजीव विभागाने युगांडाच्या मगर विभागाकडे तिला सुपूर्द केले.
Powered By Sangraha 9.0