आसाममध्ये गाेवंश संरक्षण विधेयक येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात येणार असल्याची घाेषणा तेथील राज्यपाल जगधीश मुखी यांनी केली आहे.आसामची पंचवार्षिक निवडणूक एक महिन्यापूर्वीच पार पडून तेथे भाजपाचे सरकार पुन्हा निवडून आले आहे.
(भाग : 1398)
पाच वर्षांंत केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मदतीने तेथील आणि बाजूच्या राज्यांतील दहशतवाद आटाेक्यात आणण्याचे काम केले. आसाम हे राज्य प्रामुख्याने ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसले असल्याने तेथे वाहतुकीच्या समस्या पराकाेटीच्या आहेत. गाेहत्याबंदी हा विषय दिसायला फक्त एक कायदा आणायचा, एवढ्या पुरताच मर्यादित वाटताे. पण, आसामच्या बाजूने असलेली पाच राज्ये आणि तीन देश येथे गाेमांस खाणाऱ्यांची संख्या माेठी आहे.त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या अनेक ठिकाणी दहा दहा किमी रुंद असलेले समुद्राला मिळणारे प्रवाह आहेत, तेथून बांगलादेशला ार माेठ्या प्रमाणावर गाेवंशाची चाेरटी निर्यात हाेते. तशीच गाेवंशाची चाेरटी निर्यात आमासमधूनही हाेत असे. तेथे आता नवा कायदा झाल्याने त्यावर नियंत्रण येईल.
भारतामध्ये गाय हा विषय पवित्र मानला जात असल्याने गाय वाचावी, असे बहुतेकांना वाटत असते. त्यामुळे काेठे गाेहत्याबंदी कायदा झाला की, अजून एका राज्यातून गाेहत्या कमी झाली एवढीच आपली प्रामाणिक भावना असते. ती बराेबरही आहे; पण गाेहत्या करणाऱ्यांचे षड्यंत्र किती व्यापक आहे, याची त्यावरून कल्पना येत नाही. पश्चिम बंगालमधून सात, आठ वर्षांपूर्वी दरवर्षी फक्त गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या संयुक्त मुखक्षेत्रातून म्हणजेच सुंदरवन क्षेत्रातून पंचवीस लाखांपेक्षा अधिक गाेधन बांगलादेशला चाेरट्या मार्गाने रवाना हाेत असे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी बाॅर्डर सिक्युरिटी ाेर्सची काही युनिट तयार केली. त्यामुळे ताे चाेरटा व्यापार निम्म्यावर आला; पण थांबू शकला नाही. कारण गाय किंवा बैल यांच्या दाेन्ही बाजूला केळीचे खुंट बांधून त्यांना पाण्यात साेडून दिले जात असे.
त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबराेबर त्यांचा पाचपासून वीस किमीपर्यंत पाण्यात पाेहत प्रवास हाेत असे. त्यांना हाकणारी टाेळी असे, ती त्यांच्या नावेतून त्यावर नियंत्रण ठेवत आणि बीएसएफचे सुरक्षारक्षक आले की, त्या जनावरांना तसेच जाऊ दिले जात असे. अशी पन्नास जनावरे जर दाेन दाेन फर्लांंगाच्या अंतरावरून वाहत जात असतील, तर सीमासुरक्षा दलालाही ती पकडणे अशक्य असे. त्यामुळे त्यांचे पथक परत गेल्यावर त्या नावा पुन्हा त्या गाईबैलांना एकत्र करून बांगलादेशमध्ये नेत असत. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या दरम्यान नदीच्या प्रचंड माेठ्या प्रवाहाचा ायदा घेऊन जसी चाेरटी निर्यात हाेत असे, तशीच स्थिती आसाममधून ब्रह्मपुत्रेचा प्रवाह, इरावती या म्यानमारमधील नदीचा प्रवाह आणि पलीकडे असलेल्या मेकाँग नदीचा प्रवाह यांच्या उपनद्यांतून अशीच चाेरटी निर्यात हाेत असे. त्यावर आता नियंत्रण येणार आहे. माेरेश्वर जाेशी, 9881717855